Monday, July 7, 2025
Homeब्रेकिंगकाय सोने 12,000 रुपयांनी स्वस्त होणार? तज्ज्ञांनी सांगितले सोन्याच्या घसरणी मागील कारण

काय सोने 12,000 रुपयांनी स्वस्त होणार? तज्ज्ञांनी सांगितले सोन्याच्या घसरणी मागील कारण

गेल्या काही महिन्यांत सोन्याच्या किमतीत बरेच चढ-उतार होत आले आहेत. काही दिवसांपूर्वी सोन्याचे दर १ लाख रुपयांच्या पलीकडे गेले होते. त्यानंतर या दरात घसरण दिसून आली. सध्या सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅमसाठी ९७,००० रुपयांवर आहे. तज्ज्ञांच्या मते, येत्या काळात सोन्याची किंमत सुमारे १२,००० रुपयांनी घसरण होऊ शकते. सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅमसाठी ८० ते ८५ हजारांच्या दरम्यान राहू शकतात.

 

केडिया अ‍ॅडव्हायझरीजचे संचालक अजय सुरेश केडिया यांनी सांगितले की, सध्या सोन्याच्या किमतीत काही प्रमाणात वाढ होत असली तरी येत्या काळात सोन्याचे दर कमी होती. एप्रिल-मे महिन्यात सोन्यात १० टक्के सुधारणा दिसून आली. परंतु येत्या काळात सध्याच्या दरानुसार १२,००० रुपयांची घसरण दिसून येऊ शकते. सोने ८० ते ८५ हजार रुपयांच्या दरम्यान राहू शकते. भारताने पाकिस्तानवर केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर सोन्याचे दर कमी झाले होते. सोन्याच्या किमतीत प्रति १० ग्रॅम मागे २००० रुपयांची घसरण झाली होती. आता येत्या काळात सोने आणखी स्वस्त होऊ शकते. यामागे अनेक कारणे आहेत. त्यामागे काही कारणे आहेत.

 

यामुळे सोन्याची किंमत कमी होणार

जेव्हा सोन्याचे भाव वाढले असतात तेव्हा बाजारात नफा कमवला जातो. सोन्याच्या ईटीएफमध्ये वाढ दिसून आली. यामुळे नफा कमवण्यासाठी सोन्याची विक्री होईल. त्यामुळे सोन्याच्या किमतींवर दबाव दिसून येईल.

सोन्याच्या किमतीवर जागतिक घडामोडींचा परिणाम होत असतात. जेव्हा जेव्हा जागतिक पातळीवर परिस्थिती तणावाची असते तेव्हा तेव्हा सोन्याच्या किमतीत वाढ दिसते. परंतु सध्या अमेरिकेकडून टॅरिफसंदर्भात भूमिका थोडी सौम्य करण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमी झाला आहे. यामुळे सोन्याच्या दरात घसरण होऊ शकते.

आरबीआयची मॉनेटरी पॉलिसी सोन्याच्या दरात महत्वाची भूमिका बजावत असते. आरबीआयच्या मॉनेटरी पॉलिसीच्या समितीची बैठक सहा जून रोजी होत आहे. या बैठकीत आरबीआयकडून रेपो रेटमध्ये कपात केली जाण्याची शक्यता आहे. या परिस्थितीचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर होऊ शकतो. किंमतीत घसरण होऊ शकते.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सतत फेडवर व्याजदर कमी करण्यासाठी दबाव आणत आहेत. जर फेडने दर कमी केले तर सोन्याला आधार मिळेल. परंतु सध्या फेड व्याजदर कमी करण्याची शक्यता कमी आहे. व्याजदारात कपाती झाली तर सोन्याची किमत कमी होऊ शकते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -