YouTube हे जगातील प्रसिद्ध विडिओ प्लॅटफॉर्म आहे. आपल्याला कोणताही विडिओ बघायचा असेल तर आपण सर्वात आधी युट्युब जातो. युट्युब वर काय नाही अशी एकही गोष्ट नसेल. काही लोकांनी तर युट्युब वर स्वतःचे चॅनेल काढून भरमसाठ पैसेही कमवले आहेत. त्यामुळे सर्वत्र युट्युबची चर्चा असतेच. मात्र आता याच युट्युब बाबत एक महत्वाची माहिती समोर येत आहे. गुगलने युट्युब साठी नवीन अपडेट लाँच केलं आहे. मात्र हे अपडेट्स अनेक जुन्या आयफोन आणि आयपॅडसाठी मात्र काहीच कामाचे नाही. जुन्या आयफोन आणि आयपॅडला ते सपोर्ट करत नाही. परिणामी अशा मोबाईल मधून युट्युब कायमचंच बंद पडणार आहे. हे मोबाईल कोणकोणते आहेत याची यादी आपण जाणून घेऊयात.
iOS १५ पेक्षा जुन्या ऑपरेटिंग सिस्टीमवर युट्युबचे नवीन अपडेट वर्क करणार नाही. यानुसार, आता तुम्ही iPhone 6s, iPhone 6s Plus, iPhone 7, iPhone 7 Plus किंवा पहिल्या जनरेशनच्या आयफोन एसई वर यूट्यूब अॅप इंस्टॉल किंवा अपडेट करू शकणार नाही. एवढच नव्हे तर iPod Touch 7th जनरेशन वर हि युट्युबचा सपोर्ट गेला आहे. आयपॅडबद्दल सांगायचं झाल्यास, YouTube आता फक्त iPadOS १६ किंवा नंतरच्या व्हर्जन वर काम करेल, ज्याचा फटका iPad Air २ आणि iPad mini ४ सारख्या मॉडेल ला बसेल.
यापूर्वी WhatsApp ने सुद्धा घेतला होता निर्णय –
आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे फक्त YouTubeच नाही तर काही दिवसांपूर्वी WhatsApp ने सुद्धा काही आयफोन बाबत असाच निर्णय घेतला होता. . WhatsApp आता फक्त iOS 15.1 किंवा त्यावरील आणि Android 5.0 किंवा त्यावरील व्हर्जन असलेल्या आयफोनलाच सपोर्ट करतंय. जुन्या आयफोन मधून व्हाट्सअप पूर्णपणे बंद झालं आहे. त्यानुसार, WhatsApp ने iPhone 5s, iPhone 6, Samsung Galaxy S3, HTC One X आणि Sony Xperia Z सारख्या जुन्या स्मार्टफोनचा सपोर्ट काढला आहे.