Tuesday, December 16, 2025
Homeब्रेकिंगसावधान! राज्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

सावधान! राज्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

सध्या राज्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाला आहे. काही भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडत असल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या काही दिवसात राज्यातील अनेक भागात मोठा पाऊस झाल्यामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. अशातच आता पुन्हा राज्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील दोन ते तीन दिवस राज्यात वादळी पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

 

‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

 

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, कोकणातील जिल्ह्यांमध्ये देखील तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (30 ते 40 किमी प्रतितास वेग) आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (40 ते50 किमी प्रतितास वेग) आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळं नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

 

मुंबईत कसं असणार हवामान?

पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरामध्ये तुरळक ठिकाणी ढगाळ आकाशासह मध्यम पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 34°C आणि 25°C च्या आसपास असेल.

 

गेल्या काही दिवसापासून राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. काही भागात अतिवृष्टी देखील झाली आहे. नदी नाले दुधतडी भरुन वाहत आहेत. दरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. तसेच काही भागात जास्त पाऊस पडल्यामुळं शेती पिकांचे देखील नुकसान झाले आहे. अशातच पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आली आहे. यंदा जूनच्या शेवटपर्यंत सगळ्या माझ्या महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याची पेरणी होणार आहे. त्याच्यामध्ये जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत कोणी पेरणीपासून वंचित राहणार नाही. कारण की आतापर्यंत 350 मिलमीटर पाऊस झालेला आहे आणि याच्यानंतर 7, 8 जूनला देखील भाग बदलत पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर 13 ते 17 चा देखील खूप पाऊस पडणार आहे‌.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -