Wednesday, July 23, 2025
Homeमहाराष्ट्रइतिहास घडला, वंदे भारत, देशातील सर्वात लांब बोगदा T-50 मधून सुसाट धावली,...

इतिहास घडला, वंदे भारत, देशातील सर्वात लांब बोगदा T-50 मधून सुसाट धावली, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केला प्रवास

जम्मू-काश्मीरला रेल्वेने भारताशी जोडण्याचे अनेक दशकांचे स्वप्न अखेर सत्यात उतरले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी जम्मू-कश्मीरमधील कटरा आणि श्रीनगर यांच्यामधील वंदे भारत ट्रेन सेवेचे उद्घाटन केले. ही काश्मीर खोऱ्यातील आणि जम्मू विभागातील पहिली थेट रेल्वे सेवा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दृढ संकल्पामुळे देशाचे दशकांपासूनचे जम्मू-श्रीनगर-बारामुला रेल्वेमार्गाचे स्वप्न पूर्ण झाले. भारतातील सर्वात लांब बोगद्यातून रेल्वे प्रवासाचा थरार अनुभवता येणार आहे.

 

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ‘एक्स’वर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत ते वंदे भारत ट्रेनमधून प्रवास करताना दिसत आहेत. ही ट्रेन टी-50 बोगद्यातून जाताना दिसते. त्यात बोगद्यातील दृश्य टिपण्यात आले आहे. त्यांनी जम्म-काश्मीरमधील टी-50 या भारतातील सर्वात लांब बोगद्यातून प्रवास असे कॅप्शन त्यांनी या व्हिडिओला दिले आहे. त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे.

 

12.27 किलोमीटरचा लांब बोगदा

 

टी-50 हा भारतातील सर्वात लांब बोगदा आहे. खारी आणि सुंबर दरम्यान हा बोगदा आहे. त्याची लांबी 12.77 किलोमीटर लांब इतकी आहे. याशिवाय रेल्वे लिंकमध्ये भारताचा वाहतुकीसाठीचा दुसरा सर्वात लांब बोगदा टी-80 (11.22 किमी) हा आहे. हा बोगदा बनिहाल आणि काजीगुंड यांच्यामध्ये असून त्याला पीर पंजाल रेल्वे बोगदा म्हणून ओळखले जाते.

 

जम्मू-श्रीनगर-बारामुला रेल्वेमार्गाचे स्वप्न

 

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृढ संकल्पामुळे काश्मीरला देशाच्या इतर भागांशी रेल्वेमार्गाने जोडण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले आहे. जम्मू-श्रीनगर-बारामुला रेल्वेमार्गाचे अनेक दशकांपासूनचे देशाचे स्वप्न होते. यामध्ये उंच पर्वत, खोल दऱ्या, अशा अनंत अडचणी होत्या. पण निसर्गाच्या विरुद्ध नाही तर सुसंगत असा बोगदा करायचा निश्चिय होता.

 

पूल आणि बोगद्यांच्या जाळ्यामुळे आता रेल्वे प्रकल्प वास्तवात उतरला आहे. कटरा येथे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखणवण्यात आला. हे सर्व पंतप्रधानांच्या मजबूत इच्छाशक्ती आणि ठोस प्रयत्नांमुळे शक्य झाल्याचे रेल्वेमंत्री वैष्णव यावेळी म्हणाले.

 

माँ भारतीच्या मुकुटात आणखी एक रत्न

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या रेल्वेमार्गावरील चिनाब पूल आणि अंजी पूल या दोन विशेष पुलांचे उद्घाटन केले. या रेल्वेमार्गाचा उल्लेख करताना हा एक ऐतिहासिक दिवस आहे कारण माँ भारतीच्या मुकुटात आणखी एक रत्न जोडले गेले आहे असे रेल्वेमंत्री म्हणाले. चिनाब पूल 359 मीटर उंच आहे, जो पॅरिसच्या एफिल टॉवरपेक्षा ही उंच आहे. हा पूल जगातील सर्वात उंच कमानीच्या (arch) पद्धतीचा रेल्वे पूल आहे. या रेल्वेमार्गावर 12.77 किमी लांब टी-50 बोगदा आहे. हा भारतातील वाहतुकीसाठी उपयोगात येणारा सर्वात लांब बोगदा आहे.

 

हिमालय पर्वतरांगेत बोगदा

 

कटरा- बनिहाल या दोन ठिकाणांदरम्यान बांधकाम करण्याचे मोठे आव्हान होते. 2014 नंतरच त्याचे काम सुरू झाले. या 111 किमीच्या वाहतूक पट्यात 97 किमी अंतर बोगद्यांमधून तर 7 किमी पुलांवरून पार करता येईल. नवीन तंत्रज्ञान विकसित झाले आणि हिमालय पर्वतरांगेत बोगदे खोदण्याची पद्धत तयार करण्यात आल्याचे सांगत रेल्वेमंत्र्यांनी सर्व अभियंत्यांचे आणि तंत्रज्ञांचे आभार मानले.

 

जम्मू-काश्मीर स्टेशनचा कायापालट

 

जम्मू रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. आणि सप्टेंबरपर्यंत तीन प्लॅटफॉर्म तयार होतील. शुक्रवारी ट्रेन कटरामधून रवाना झाली.जम्मू-श्रीनगर वंदे भारत ट्रेन असेल आणि सप्टेंबरपासून ती जम्मूमधून धावेल अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -