देशात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. एकीकडे रुग्ण वाढत असले तरी लोक वेगाने बरे होत आहेत. त्यामुळे सक्रिय प्रकरणांची एकूण संख्या दोन दिवसांपेक्षा जास्त वाढत नाही.
मात्र धोका अजूनही टळलेला नाही. काल दिवसभरात देशात 11 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. त्यातच आता मध्यप्रदेशमधून एक मतोही बातमी समोर येत आहे.
मध्यप्रदेशच्या जबलपूर येथून एक मोठी बातमी समोर येत आहे. रविवारी जबलपूरमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे. बाळाला जन्म दिल्यानंतर या महिलेचा मृत्यू झाला आहे. मृत्यू कशामुळे झाला यासाठी काही तपासणी केली असता त्या महिलेचा मृत्यू कोरोनाने झाले असल्याचे समोर आले आहे.
देशभरात कोरोनाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. तथापि, यातून बरे होणाऱ्या रूग्णांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे. मात्र अजूनही धोका टळलेला नाही. देशात सध्या 7 हजरांपेक्षा जास्त सक्रिय रूग्ण आहेत. तर मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या 99 वर पोहोचली आहे.
महाराष्ट्रात काय परिस्थिती?
महाराष्ट्रात देखील गेल्या 24 तासांमध्ये 57 कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. महराष्ट्र सरकारने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.