Wednesday, June 25, 2025
Homeमहाराष्ट्रEPFO खातेधारकांना 4 लाखांचा फायदा; सरकारने घेतला मोठा निर्णय

EPFO खातेधारकांना 4 लाखांचा फायदा; सरकारने घेतला मोठा निर्णय

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच ईपीएफओच्या सदस्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. सरकारने आता ईपीएफओ खातेदारांना त्यांच्या पीएफ फंडामधून अगाऊमध्ये अधिक पैसे काढण्याच्या रकमेत वाढ केली आहे. यापूर्वी EPFO खातेधारकांना अडचणीच्या किंवा इमर्जन्सीच्या काळात जास्तीत जास्त १ लाख रुपये काढता येत होते. आता मात्र सरकारने ऑटो सेटलमेंटची मर्यादेमध्ये मोठी वाढ केली आहे. ही रक्कम 1 लाखांवरुन 5 लाख रुपये करण्यात आली आहे. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी याबाबत माहिती दिली आहे.

 

ऑटो-सेटलमेंट मध्ये वाढ – EPFO

खरं तर सदस्यांना जलद आर्थिक मदत देण्यासाठी ईपीएफओने कोविड-१९ महामारी दरम्यान प्रथमच आगाऊ दाव्यांचे ऑटो-सेटलमेंट सुरू केले होते. लोकांना त्यांचे पैसे लवकरात लवकर मिळू शकतील हा सरकारचा उद्देश होता. त्यावेळी ऑटो-सेटलमेंटद्वारे EPFO सदस्यांना १ लाख रुपये काढता येत होते. आता मात्र हीच रक्कम १ लाख रुपयांवरून ५ लाख रुपये करण्यात आली आहे. म्हणजेच काय तर कर्मचाऱ्यांना आता ४ लाखांचा फायदा होणार आहे. ज्यांना अचानक आपत्कालीन परिस्थितीत पैशांची गरज भासते अशा लोकांना यामुळे खूप फायदा होईल असं बोललं जातंय.

 

दुसरीकडे, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) सदस्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. आता देयकाची रक्कम क्लेम करणे अधिक सोपे झाले आहे आणि यासाठी चेक लीफ किंवा पासबुकची आवश्यकता नाही. कामगार विभागाने त्यांच्या एक्स हँडलवर याबाबत माहिती देत म्हंटल कि, “सदस्यांसाठी आनंदाची बातमी! तुमचा क्लेम दाखल करणे आता सोपे झाले आहे – चेक लीफ किंवा बँक पासबुकचे फोटो अपलोड करण्याची आवश्यकता नाही. नवीन सोप्या ऑनलाइन प्रक्रियेसह, तुम्ही आता फक्त काही क्लिकमध्ये तुमचे क्लेम सादर करू शकता. जलद, त्रासमुक्त आणि तुमचा वेळ वाचवण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे विभागाने म्हंटल.

 

दरम्यान, ईपीएफओ सदस्यांमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे. ताज्या आकडेवारीनुसार, एप्रिल 2025 मध्ये 19.14 लाख नवीन सदस्य सामील झाले आहेत. मार्च 2025 च्या तुलनेत ही वाढ 31.31 टक्के इतकी आहे. गेल्या वर्षी एप्रिल 2024 च्या तुलनेत आताच्या ईपीएफओ खातेधारकांची वाढ ही 1.17 टक्के जास्त आहे. आश्चर्याची बाब म्हणजे यात सर्वात जास्त सहभाग 18 ते 25 वयोगटातील तरुणांचा आहे. या वयोगटात 4.89 लाख लोक ईपीएफओमध्ये सामील झाले, जे एकूण नवीन सदस्यांच्या 57.67 टक्के आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -