Thursday, July 3, 2025
Homeमहाराष्ट्रNothing Phone 3 भारतात लाँच; पहा किंमत आणि फीचर्स

Nothing Phone 3 भारतात लाँच; पहा किंमत आणि फीचर्स

नथिंग फोनने भारतात आपला नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. Nothing Phone 3 असं या मोबाईलचे नाव आहे. हा स्मार्टफोन ३ व्हेरियंट मध्ये लाँच करण्यात आला आहे. मोबाईल मध्ये अनेक उत्कृष्ट फीचर्स देण्यात आले आहेत. मोबाईलचा लूक सुद्धा अतिशय आकर्षक असाच आहे. हा स्मार्टफोन काळ्या आणि पांढऱ्या रंगात लाँच करण्यात आला आहे. आज आपण या मोबाईलचा कॅमेरा, प्रोसेसर, रॅम आणि किंमत याबाबत अगदी सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

 

डिस्प्ले-

Nothing Phone 3 मध्ये ६.६७-इंचाचा १.५K AMOLED डिस्प्ले बसवण्यात आला आहे. या डिस्प्लेला १२०Hz रिफ्रेश रेट आणि ४,५००nits पीक ब्राइटनेस मिळते. संरक्षणासाठी, समोर गोरिल्ला ग्लास ७i आणि मागील बाजूस व्हिक्टस ग्लास बसवण्यात आली आहे. कंपनीने मोबाईल मध्ये स्नॅपड्रॅगन ८s जेन ४ प्रोसेसर बसवला असून मोबाईल मध्ये तब्बल १६ जीबी रॅम आणि ५१२ mb स्टोरेज देण्यात आलं आहे. या स्मार्टफोन अँड्रॉइड १५ वर आधारित नथिंग ओएस ३.५ या ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो.

 

कॅमेरा – Nothing Phone 3

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायच झाल्यास, Nothing Phone 3 मध्ये पाठीमागील बाजूस ३ 50MP कॅमेरा आहेत. त्यामध्ये 3x ऑप्टिकल झूम असलेला पेरिस्कोप टेलिफोटो आणि अल्ट्रा-वाइड लेन्स समाविष्ट आहे. तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 50MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवर साठी मोबाईलला 5,500mAh बॅटरी बसवण्यात आली आहे हि बॅटरी 65W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीचा असा दावा आहे कि, 54 मिनिटांत 0 ते 100% पर्यंत चार्ज केली जाऊ शकते. याशिवाय, 15W वायरलेस चार्जिंग, 7.5W रिव्हर्स वायर्ड आणि 5W रिव्हर्स वायरलेस चार्जिंग देण्यात आले आहेत.

 

किंमत किती?

नथिंग फोन ३ दोन प्रकारांमध्ये लाँच करण्यात आला आहे. यातील १२ जीबी + २५६ जीबी मॉडेलची किंमत भारतात ७९,९९९ रुपये आहे, तर टॉप व्हेरियंट १६ जीबी + ५१२ जीबी व्हेरिएंटची किंमत ८९,९९९ रुपये आहे. हा स्मार्टफोन काळया आणि पांढऱ्या रंगात उपलब्ध आहे .

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -