Thursday, July 3, 2025
Homeमहाराष्ट्रफक्त 99 रुपयांत जेवण; Swiggy ने सुरु केली नवी सर्व्हिस

फक्त 99 रुपयांत जेवण; Swiggy ने सुरु केली नवी सर्व्हिस

ऑनलाईन फूड डिलिव्हरी अँप Swiggy ने आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. स्विगीने ‘९९ स्टोअर’ ही नवीन सेवा सुरू केली आहे. या सेवेच्या माध्यमातून कंपनी फक्त ९९ रुपयांमध्ये सिंगल सर्व्ह मील देणार आहे. Swiggy ही सुविधा देशभरातील १७५ हून अधिक शहरांमध्ये सुरु केली आहे. कमी किमतीत जेवण करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी स्वीगीने ही खास सेवा सुरु केली आहे. अवघ्या ९९ रुपयांत घरपोच जेवण मिळत असल्याने आता ऑनलाईनअन्न ऑर्डर करणे आणखी स्वस्त होणार आहे.

 

कोणकोणत्या शहरात सुरु झाले Swiggy 99 store ?

Swiggy 99 Store देशभरातील १७५ मोठ्या शहरात सुरु करण्यात आली आहे. यामध्ये बेंगळुरू, अहमदाबाद, कोलकाता, हैदराबाद, दिल्ली, पुणे, चेन्नई, लखनऊ, वडोदरा सारख्या शहरांचा समावेश आहे. ९९ स्टोअरमध्ये ग्राहकांना ९९ रुपयांपर्यंत किमतीचे रेडी-टू-ईट डिशेस मिळतील अशी माहिती कंपनीने दिली आहे. हे डिशेस ताज्या ऑर्डरवर तयार केले जातील. अवघ्या ९९ रुपयांमध्ये ग्राहकांना रोल, बिर्याणी, नूडल्स, उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय, बर्गर, पिझ्झा आणि केक अशा अनेक चमचमीत पदार्थांचा आनंद घेता येणार आहे. त्यामुळे खवय्यांसाठी ही चांगलीच मेजवानी ठरेल.

 

स्विगीच्या फूड मार्केटप्लेसचे सीईओ रोहित कपूर यांनी म्हंटल कि, जेवणाची किंमत कमी असल्याचा अर्थ असा नाही कि तुमच्याकडे जेवण ऑर्डर करण्यासाठी कमी पर्याय असतील, उलट आम्ही रेस्टॉरंट पार्टनर्स आणि आमच्या डिलिव्हरी फ्लीटसोबत मिळून दररोज परवडणारे आणि चांगल्या दर्जाचे पदार्थ कसे बनवता येतील यावर काम केलं आहे. त्यामुळे ९९ रुपयांत जेवण हे फक्त किमतीचा प्रश्न नाही तर एक आश्वासन आहे असं रोहित कपूर यांनी म्हंटल.

 

अशी करा ऑर्डर?

सर्वात आधी Swiggy अँप ओपन करा.

यानंतर Food च्या पर्यायावर क्लीक करा.

येथे तुम्हाला Swiggy 99 Store चा पर्याय मिळेल.

ता तुम्हाला या सेगमेंटमध्ये येणारे सर्व पर्याय दिसू लागतील.

कंपनी इकोसेव्हर मोडसह मोफत डिलिव्हरी देत आहे.

येथे तुम्ही ९९ रुपयांत काय ऑर्डर करायचे ते ठरवू शकता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -