Thursday, July 3, 2025
Homeमहाराष्ट्रबेजबाबदारपणे गाडी चालवल्याने झालेल्या मृत्यूसाठी भरपाई देण्यास विमा कंपनी जबाबदार नाही :...

बेजबाबदारपणे गाडी चालवल्याने झालेल्या मृत्यूसाठी भरपाई देण्यास विमा कंपनी जबाबदार नाही : सर्वोच्च न्यायालय

बेजबाबदारपणे गाडी चालवल्याने झालेल्या अपघाती मृत्यूसाठी विमा कंपनी भरपाई देण्यास जबाबदार नाही, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले. न्यायाधीश पी. एस. नरसिम्हा आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या खंडपीठाने वेगाने गाडी चालवताना मृत्यू झालेल्या एका व्यक्तीच्या पत्नी, मुलगा आणि पालकांनी मागितलेल्या ८० लाख रुपयांच्या भरपाई देण्यास नकार दिला.

 

कर्नाटक उच्च न्यायालयाच्या गेल्या वर्षी २३ नोव्हेंबर रोजीच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. उच्च न्यायालयाने मृताच्या कायदेशीर वारसांनी भरपाईचा दावा करून दाखल केलेली याचिका फेटाळून लावली होती. यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने देखील त्यांची याचिका फेटाळून लावली.

 

दरम्यान, १८ जून २०१४ रोजी हा अपघात झाला होता. कर्नाटक उच्च न्यायालयाला असे आढळून आले होते की, या अपघातात वाहतूक नियमांचे पालन न करता निष्काळजीपणे गाडी चालवली गेली. वाहनावरील नियंत्रण सुटले आणि त्यामुळे चालक रस्त्यावर कोसळला. या अपघातात चालकाला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. हा अपघात मृत व्यक्तीच्याच बेजबाबदार आणि निष्काळजीपणे गाडी चालवल्यामुळे झाला. त्यामुळे कायदेशीर वारस त्याच्या मृत्यूसाठी कोणत्याही भरपाईचा दावा करू शकत नाहीत, असे न्यायालयाने म्हटले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -