Sunday, July 6, 2025
Homeब्रेकिंगYouTube नियमात मोठा बदल; कंटेंट क्रिएटर्सला बसणार झटका, कमाई कमी होण्याची शक्यता,...

YouTube नियमात मोठा बदल; कंटेंट क्रिएटर्सला बसणार झटका, कमाई कमी होण्याची शक्यता, अपडेट काय?

Youtube आता मॉनेटायझेशन नियमात बदल करण्याची तयारी करत आहे. त्यामुळे कंटेंट क्रिएटर्सच्या कमाई धोरणावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. युट्यूब पार्टनर प्रोग्राम, हा या प्लॅटफॉर्मवर मॉनेटायझेश पॉलिसी नियंत्रित करतो. नेहमी खरा आणि अधिकृत कंटेंट प्रसिद्ध करण्यासाठी हा प्लॅटफॉर्म प्रोत्साहन देतो. आता नवीन नियमानुसार, जे कंटेंट क्रिएटर्स तेच ते व्हिडिओ अथवा कॉपी पेस्ट व्हिडिओ अपलोड करतात, त्यांच्यावर कारवाई करेल. युट्यूबवर मास्ट प्रोड्यूस्ड कंटेंट क्रिएटर्सला आता कंटेंट तयार करताना अधिक काळजी घ्यावी लागेल. जर व्हिडिओ नवीन नसेल, कुणाचा तरी ढापला असेल तर त्याची ओळख पटवण्यात येईल. 15 जुलै पासून हे नवीन नियम लागू होती. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना काय शिक्षा देणार हे युट्यूबने अद्याप स्पष्ट केलेले नाही. पण एका दाव्यानुसार, ओरिजनल कंटेंट नसेल तर अशांच्या कमाईवर थेट परिणाम होईल.

 

Google मालकीच्या व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मने उत्पन्न धोरणात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. मोठ्या प्रमाणावर तयार होणारे आणि वारंवार पुनरावृत्ती होणारा कंटेंटची आता ओळख पटवण्यात येणार आहे. त्यावर नियंत्रण ठेवता येईल. कंटेंट क्रिएटर्संनी नेहमीच खरा, मूळ आणि प्रामाणिक कंटेंट अपलोड करावा असे कंपनीचे पूर्वीपासूनचे धोरण आहे. पण काही कंटेंट क्रिएटर्स विविध प्लॅटफॉर्म्सचा वापर करत जुनेच व्हिडिओ थोडाफार बदल करून अपलोड करत आहेत. त्यामुळे एकूणच युट्यूबवर स्क्रोल करताना तोच तोच कंटेंट अल्गोरिदम आधारे दिसून येत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या.

 

कमाई करायची तर मग मेहनत करा

 

YouTube चा मूळ आणि खरा कंटेंट प्रसिद्ध करण्यावर जोर आहे. हे त्यांचे पूर्वीपासूनचे धोरण आहे. कंपनीने नेहमी मॉनेटायझेशन पॉलिसीत सर्वात अगोदर ओरिजिनल कंटेंटची गरज व्यक्त केलेली आहे. जर युट्यूबवरून कमाई करायची असेल तर तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. कंटेंट क्रिएटर्संना खरा आणि अधिकृत कंटेंट, स्टोरी द्यावी लागेल, असे युट्यूबने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.

 

कोणाला होणार फायदा?

 

Youtube वर अनेक जण मेहनत घेऊन कंटेंट अपलोड करतात. पण त्यांना लाईक्स, व्ह्यूज, सबस्क्राईबर मिळण्याचे मोठे आव्हान असते. तर उथळ आणि कॉपी पेस्ट व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांना चांगले ट्रॅफिक मिळते. अविश्वसनीय आणि पुनरावृत्ती केलेल्या व्हिडिओवर कारवाई होईल. पुनरावृत्ती व्हिडिओ शोधण्यासाठी युट्यूब कृत्रिम बुद्धिमत्तेचा AI चा वापर करण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -