सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात अतिशय दुःखद घटना घडली आहे. तडवळ येथे डॉ. आशिष इरण्णा पनशेट्टी (वय ४०) यांचा कार अपघातात मृत्यू झाला. हा अपघात मद्रे आणि आहेरवाडीच्या दरम्यान झाला.
डॉ. आशिष रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने त्यांच्या पत्नीने त्यांना फोन केला. पण संपर्क होऊ शकला नाही. सकाळी त्यांचा मृतदेह गाडीत आढळला. ते तडवळमध्ये एक हॉस्पिटल चालवत होते. त्यांच्या जाण्याने गावात शोककळा पसरला आहे.
डॉ. आशिष पनशेट्टी यांचा अपघात रविवारी रात्री झाला. ते सोलापूरहून तडवळकडे कारने जात होते. रस्त्यात मद्रेजवळ त्यांची गाडी खड्ड्यात अडकली. त्यानंतर त्यांची गाडी जवळच्या लाकडाच्या ढिगाऱ्यात जाऊन आदळली आणि पलटी झाली. अपघातामुळे ते गाडीच्या स्टेअरिंग आणि सीटमध्ये अडकून पडले होते. त्यांना बाहेर पडता आलं नाही.
Mumbai Crime : आधी १८ महिन्यांचा लेक गेला, आता वडिलांना दोन भावांनी भररस्त्यात संपवलं; वडाळ्यातील भयंकर घटना, मुंबईत खळबळ
अपघात झाल्यानंतर डॉ. आशिष यांना वेळेवर मदत मिळाली नाही. त्यांचा मृतदेह तब्बल सहा तास अपघातस्थळी पडून होता. सकाळी एका शेतकऱ्याने अपघात पाहिला आणि लोकांना माहिती दिली. अपघाताची माहिती मिळताच सैफुल पोलीस चौकीचे हवालदार विलास घुगे यांनी मृतदेह छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात पाठवला.
Nagpur News : स्विमिंग पूलमध्ये उतरले; काही क्षणात होत्याचं नव्हतं, नागपुरात ज्येष्ठ नागरिकासोबत काय घडलं?
रात्री उशिरापर्यंत डॉ. आशिष घरी आले नाहीत. घरी न आल्याने त्यांच्या पत्नीने त्यांना रात्री २ वाजता फोन केला. पण त्यांनी फोन उचलला नाही. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नीने रात्री फोन केला, पण आपल्या पत्नीबाबत त्यांना कोणतीच माहिती मिळाली नाही. थेट सकाळीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आणि कुटुंबाला मोठा धक्का बसला.
डॉ. आशिष हे तडवळमधील एक प्रसिद्ध डॉक्टर होते. ते गावात खासगी हॉस्पिटल चालवत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा आणि भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने गावात शोककळा पसरली आहे. गावातील उच्चशिक्षित, डॉक्टर तरुणाचा दुर्दैवी अंत झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. डॉ. आशिष यांच्या जाण्याने तडवळ गावाला मोठा धक्का बसला आहे. ते केवळ एक डॉक्टर नव्हते, तर एक चांगले व्यक्ती म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.