Monday, July 28, 2025
Homeमहाराष्ट्ररिक्षाचालक दारूच्या नशेत चढला मोबाईल टॉवरवर, तीन तास सुरू होता गोंधळ

रिक्षाचालक दारूच्या नशेत चढला मोबाईल टॉवरवर, तीन तास सुरू होता गोंधळ

रिक्षाचालक दारूच्या नशेत थेट मोबाईल टॉवरवर चढला. हा प्रकार दुपारी तीनच्या सुमारास डीकेएमएम महाविद्यालयाजवळ, पहाडसिंगपुरा भागात घडला.

 

बेगमपुरा पोलिसांनी धाव घेतली. त्याला खाली येण्यासाठी सांगूनही तो ऐकत नव्हता. अखेर अग्निशमनचे जवान दाखल झाले. सायंकाळी सहाच्या सुमारास त्याला सुखरूप खाली उतरविण्यात आले. रिक्षाचालक विजय रामराव भवरे (५३, रा. न्यू पहाडसिंगपुरा) असे त्याचे नाव असल्याची माहिती पोलिस निरीक्षक मंगेश जगताप यांनी दिली.

 

भवरे हा डीकेएमएम कॉलेज समोर असलेल्या मोबाईल टॉवरवर चढला. तो दारूच्या नशेत धुंद होता. दुपारी तीनच्या सुमारास बेगमपुरा पोलिसांना याची माहिती मिळाली. पोलिस निरीक्षक मंगेश जगताप यांनी फौजफाटा घेऊन धाव घेतली. दामिनी पथकाच्या उपनिरीक्षक कांचन मिरघे, अंमलदार कल्पना खरात, निर्मला निंभोरे, सरिता कुंडारे, कविता गवळी, कल्पना नागरे, जाधव, फुले या देखील पोहोचल्या. टॉवरवर व्यक्ती चढला असल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

 

त्यानंतर अग्निशमनला कळविण्यात आले. उप अग्निशमन केंद्र अधिकारी विजय राठोड, अशोक खांडेकर, ड्युटी इन्चार्ज दीपराज गंगावणे, संग्राम मोरे, अजिंक्य भगत, दीपक गाडेकर, प्रणाल सूर्यवंशी, मनसुब सपकाळ, उमेश भोसले,जगदीश सलामवाद यांनी टॉवरवर जाऊन भवरेला सुखरूप खाली उतरविले. त्यानंतर सर्वानी सुटकेचा निश्वास सोडला. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात दारू पिऊन गोंधळ घातल्याप्रकरणी भवरे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

तीन तास सुरू होता गोंधळ

 

विजय भवरे हा टॉवरवर चढून एका ठिकाणी झोपला. दारूच्या नशेत धुंद असल्याने हात, पाय सोडून खाली डोकावत होता. त्याचा तोल जात असल्याने खालून जमलेले नागरिक ओरडायचे. त्यानंतर तो पुन्हा मागे सरकायचा. हा गोंधळ तीन तास सुरू होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -