Tuesday, July 22, 2025
Homeक्रीडाटीम इंडियाच्या डोकेदुखीत वाढ, चौथ्या सामन्याआधी मॅचविनर बॉलरला दुखापत, मँचेस्टर टेस्टला मुकणार!

टीम इंडियाच्या डोकेदुखीत वाढ, चौथ्या सामन्याआधी मॅचविनर बॉलरला दुखापत, मँचेस्टर टेस्टला मुकणार!

टीम इंडिया इंग्लंड विरूद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-2 अशा फरकाने पिछाडीवर आहे. इंग्लंडने लॉर्ड्समध्ये झालेल्या तिसर्‍या सामन्यात टीम इंडियावर 22 धावांनी मात केली होती. इंग्लंडने भारताला 193 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र इंग्लंडने भारताला या धावांचा पाठलाग करताना 170 धावांवर रोखलं. इंग्लंडने यासह या मालिकेतील दुसरा सामना जिंकला. आता उभयसंघातील चौथा सामना हा 23 जुलैपासून मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात होणार आहे.

 

टीम इंडियाकडून सरावाला सुरुवात

टीम इंडियाने मँचेस्टर कसोटीसाठी कंबर कसली आहे. टीम इंडियाने या सामन्यासाठी जोरदार सरावाला सुरुवात केली आहे. मात्र या दरम्यान भारतीय संघाची डोकेदुखी वाढली आहे. टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजाला दुखापत झाली आहे. डावखुरा गोलंदाज अर्शदीप सिंह याला दुखापत झाल्याचं म्हटलं जात आहे.

 

सरावादरम्यान अर्शदीपच्या डाव्या हातावर पट्टी बांधली होती. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र याबाबत बीसीसीआयने याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र अर्शदीपला झालेली दुखापत गंभीर असेल तर त्याला कसोटी पदार्पणासाठी आणखी प्रतिक्षा करावी लागू शकते.

 

अर्शदीप सिंह याची प्रतिक्षा वाढणार!

अर्शदीप सिंह याला आतापर्यंत इंग्लंड विरूद्धच्या 3 पैकी एकही सामन्यात प्लेइंग ईलेव्हनध्ये संधी मिळालेली नाही. अर्शदीपचं अद्याप कसोटी पदार्पण झालेलं नाही. भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह किंवा इतर कोणत्याही गोलंदाजाला विश्रांती दिल्यास अर्शदीपला कसोटी पदार्पणाची संधी मिळू शकते. आता अर्शदीपला संधी मिळणार की नाही? हे त्याच्या दुखापतीवर अवलंबून असणार आहे.

 

जसप्रीत बुमराह वर्कलोड मॅनेजमेंटमुळे इंग्लंड विरूद्धच्या 5 पैकी फक्त 3 सामन्यांमध्येच खेळणार असल्याचं स्पष्ट आहे. बुमराह 3 पैकी 2 सामेन खेळला आहे. त्यामुळे बुमराह आता उर्वरित 2 पैकी 1 सामन्यात खेळणार आहे.

 

अर्शदीपला दुखापत, भारताला टेन्शन

अर्शदीपची वनडे आणि टी 20i मधील कामगिरी

अर्शदीपने आतापर्यंत टीम इंडियासाठी वनडे आणि टी 20i या दोन्ही फॉर्मेटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. अर्शदीपने 9 एकदिवसीय सामन्यांमध्ये 14 विकेट्स मिळवल्या आहेत. तर अर्शदीपने 63 टी 20i सामन्यांमध्ये 99 विकेट्स घेतल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -