भारतातील तिसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या VI म्हणजेच वोडाफोन- आयडियाने आपल्या ग्राहकांसाठी एक खुशखबर दिली आहे. कमी किमतीत जास्तीत जास्त फायदे देण्यासाठी कंपनीने आपल्या १९९ आणि १७९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅन मध्ये काही बदल केले आहेत. यानुसार कंपनीकडून इंटरनेट डेटा आणि वैधता वाढवण्यात आली आहे. ज्यामुळे ग्राहक vi कडे आणखी आकर्षित होऊ शकतात. VI ने अलीकडेच त्यांची 5G सेवा सुरू केली आहे. त्यातच आता रिचार्जमध्ये बदल केल्याने एअरटेल आणि जिओ सारख्या आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांना थेट टक्कर मिळणार आहे. VI च्या या ऑफर नेमक्या आहेत तरी काय? ग्राहकांना यातून कसा फायदा होईल तेच आपण सविस्तर जाणून घेऊयात.
VI चा 199 रुपयांचा प्लॅन- VI Recharge Plans
खरं तर VI चा 199 रुपयांचा प्लॅन अशा ग्राहकांसाठी आहे ज्यांना कमी किमतीत कॉलिंग आणि इंटरनेट या दोन्हीचा लाभ घ्यायचा असतो. हा रिचार्ज प्लॅन पूर्ण 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. 28 दिवसांच्या वैधतेसह या प्लॅनमध्ये, वापरकर्त्यांना अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. यासोबत, 300 मोफत एसएमएसचा लाभ घेता येतोय. वोडाफोन आयडियाच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना यापूर्वी फक्त २ जीबी डेटाचा फायदा मिळत होता, पण आता या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना ३ जीबी डेटाचा फायदा मिळेल म्हणजेच आता VI या प्लॅनमध्ये १ जीबी अतिरिक्त डेटा देत आहे. मात्र याठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा कि दररोज ३ जीबी डेटा मिळणार नाही, तर एकूण 28 दिवसांच्या कालावधीसाठी हा ३ जीबी इंटरनेट डेटा असेल. म्हणजेच काय तर हा प्लॅन (VI Recharge Plans) त्या ग्राहकांसाठी बेस्ट आहे जे जास्त इंटरनेट वापरत नाहीत आणि त्यांना फक्त कॉलिंग आणि थोडासा डेटा हवा असतो.
VI चा 179 रुपयांचा प्लॅन-
VI चा 179 रुपयांचा प्लॅन पूर्ण २८ दिवसांच्या वैधतेसह येतो. पूर्वी या प्लॅनमध्ये (VI Recharge Plans) वापरकर्त्यांना फक्त २४ दिवसांची वैधता मिळत होती, परंतु आता या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना ४ दिवसांची अतिरिक्त व्हॅलिडिटी मिळेल. म्हणजेच, ग्राहक आता कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय आणखी चार दिवसांची सेवा घेऊ शकतात. या प्लॅनमध्ये ग्राहकांना ऍनीमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. यासोबतच ३०० मोफत एसएमएसचा लाभ सुद्धा घेता येतो. बाकी इंटरनेट डेटाबद्दल बोलायचे झाले तर, या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना फक्त १ जीबी डेटाचा फायदा मिळतो. म्हणजेच काय तर हा रिचार्ज प्लॅन सुद्धा अशा यूजर्सना फायदेशीर आहे जे इंटरनेटचा वापर खूप कमी करतात आणि मुख्यतः कॉलिंगसाठी रिचार्ज करतात. खरं तर आजच्या काळात, एकीकडे रिचार्जच्या किमती गगनाला भिडल्या असताना १७९ रुपयांमध्ये २८ दिवसांची व्हॅलिडिटी मिळणे नक्कीच परवडणारी बाब आहे.