आज विज्ञान युगात माणूस चंद्रावर जात असला तर अंधश्रद्धेचे दुकान जोरात आहे. राजस्थानात एका तांत्रिकाने आकाशात पैशांचा पाऊस पाडतो, जमिनीत गाडलेले गुप्तधन मिळवून देतो या नावाखाली ६० लाखांना गंडा घातला आहे. या तांत्रिकाने संबंधित तरुणाकडून पुजेच्या नावाखाली दहा हजार अत्तराच्या बाटल्या बरबाद केल्या. एक हजार नारळ इकडे तिकडे फेकले आणि सिगारेट्सची दहा हजार पाकिट्स जाळल्याचे उघडकीस आले आहे.
हे संपूर्ण प्रकरण उदयपुरच्या गोवर्धन विलास ठाणे हद्दीतील आहे. आरोपी तांत्रिकाचे नाव इंद्रदास वैष्णव असे आहे. या युवकाने नाव सत्यनारायण सुथार आहे.सत्यनारायण सुथार राज्याच्या भिलवाडा जिल्ह्याचा रहिवासी आहे. त्याने एसपीजवळ तक्रार केली आहे. तक्रारीत युवकाने सांगितले की साल २०२४ मध्ये जानेवारीमध्ये तो त्याचा मित्रासह उदयपुरला फिरायला गेला होता.
जमीनीतून सोने काढण्याचा दावा
या तरुणाने सांगितले की उदयपुरला फिरायला गेले असताना त्याची भेट मांत्रिक इंद्रदास वैष्णव यांच्याशी झाली. त्याने त्यास सांगितले की तो जमीनीतून गुप्त सोने काढण्यास सक्षम आहे. त्यानंतर त्याने त्याच्या जमीनीतून सोने काढण्याचे आमीष दाखवले.त्यानंतर त्या मांत्रिकाने अडीच लाख मागितले. त्यानंतर तो त्याचा मित्रांसह गावी गेला. गावी गेल्यानंतर मांत्रिक इंद्रदास याने फोन करुन त्यांच्या कारखान्यात आणि घराच्या खाली सोने पुरले असल्याचे सांगितले.
त्यानंतर हा तरुण त्याच्या मित्रासह पुन्हा उदयपुरला आला आणि इंद्रदास याला पाच लाख रुपये दिले. त्यानंतर दोघांना त्याने घरी पाठवले. त्याने सत्यनारायण सुथारला रात्री १२ वाजल्यानंतर घरात ५० सिगारेट्स जाळून, अत्तराच्या २० बाटल्या खोलून आणि दीपक पेटवायला सांगितले. त्याने सांगितले की उदयपुर येथून पुजा करीत आहे. अनेक दिवसांनंतर सत्यनारायण सुथार याने त्याला विचारले की अजून किती दिवस पुजा होणार ?
लागोपाठ पैसे उकळत होता
यावर आरोपीने युवकास सांगितले की पूजा पाच दिवस आणखी होणार आहे.त्यानंतर खोलीत नोटांचा पाऊस होणार. पाच दिवस पूर्ण झाल्यानंतर त्याने सांगितले की ५१ दिवस आणखी पूजा होणार. याच्या बदल्यात त्याने आणखी सात लाखांची मागणी केली. युवकाने सात लाख रुपये उधार घेऊन त्याला दिले. त्याने साल २०२४च्या जानेवारी पर्यंत पूजा केली. त्यानंतर पुन्हा सहा महिने पुजा करायची आहे असे सांगितले.
युवकाने पुन्हा तांत्रिकाला १२.९० लाख रुपये आणखी दिले. गेल्या मार्चमध्ये त्याने सांगितले की पूजा असफल झाली आहे. आणखी पूजा करण्यासाठी तांत्रिकाने पुन्हा ९ लाख रुपयांची मागणी केली आणि तिही मागणी युवकाने पूर्ण केली. अशा प्रकारे तांत्रिकाने त्याला संपूर्ण लुबाडत त्याच्याकडून एकूण ६० लाख लुटले.