राज्यातील लाखो रेशन कार्डधारकांसाठी एक अत्यंत(holders)महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. जर तुम्हीही रेशनवर धान्य घेत असाल आणि अद्याप ‘ई-केवायसी’ प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल, तर ही बातमी तुम्हासाठीच आहे. सप्टेंबर २०२५ पासून ई-केवायसी न केलेल्या लाभार्थ्यांना रेशनवरील धान्य मिळणार नाही, असा स्पष्ट इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत राज्यातील सर्व प्राधान्य व अंत्योदय लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आले आहे. सरकारने यासाठी यापूर्वी तीन वेळा मुदतवाढ दिली होती. मात्र तरीही अनेकांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. शहापूर तालुक्यातील तब्बल ४३,००० लाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप बाकी आहे.
शासनाने यासाठी ३१ जुलै २०२५ ही अंतिम तारीख जाहीर केली आहे. त्यानंतर ई-केवायसी न झालेल्या कार्डधारकांचा रेशनवरील हक्क थांबवण्यात येणार आहे. संबंधित तहसील (holders)कार्यालयांकडून ही माहिती अधिकृतपणे देण्यात आली असून, नागरिकांना लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.ई-केवायसी करण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या सेवा केंद्रावर जाऊ शकता. त्यासाठी आधार कार्ड आणि रेशन कार्ड आवश्यक आहे.
याशिवाय, मोबाईलवरून ‘मेरा केवायसी’ हे अॅप गुगल(holders) प्ले स्टोअरवरून डाउनलोड करूनही ही प्रक्रिया करता येते. अॅपद्वारे घरबसल्या ई-केवायसी करण्याची सुविधा उपलब्ध आहे. जर तुम्ही अद्याप ई-केवायसी पूर्ण केलेली नसेल, तर ३१ जुलैपूर्वी ती पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा, सप्टेंबरपासून तुम्हाला शिधावाटपाचा लाभ मिळणार नाही. ही प्रक्रिया अत्यंत सोपी असून काही मिनिटांत पूर्ण करता येते.