नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांसाठी खुशखबर आहे. केंद्रातील मोदी सरकारने एक नवीन योजना सुरु केली आहे. ‘प्रधानमंत्री विकासशील भारत रोजगार योजना असं या योजनेचं नाव असून या योजनेच्या माध्यमातून पुढील २ वर्षात ३.५० कोटी लोकांना नोकऱ्या मिळणार आहेत. रोजगाराशी संबंधित प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं हि योजना सुरु केली आहे. केंद्रिय मंत्रिमंडळ बैठकीत हि योजना मंजूर करण्यात आली असून 99 हजार 446 कोटी रुपयांची तरतूद यासाठी करण्यात आली आहे. लोकांना रोजगार देणारी हि योजना 1 ऑगस्ट 2025 पासून लागू होणार आहे.
काय आहे खास ? PM Viksit Bharat Rojgar Yojana
‘प्रधानमंत्री विकासशील भारत रोजगार योजने’च्या (PM Viksit Bharat Rojgar Yojana) माध्यमातून 2 वर्षांत 3.5 कोटींहून अधिक नोकऱ्या निर्माण करण्यास प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट आहे. यापैकी 1.92 कोटी लाभार्थी पहिल्यांदाच कामगार दलात सामील होतील. या योजनेचा लाभ 1 ऑगस्ट 2025 ते 31 जुलै 2027 दरम्यान निर्माण झालेल्या नोकऱ्यांना लागू होईल. या योजनेचे दोन भाग आहेत. भाग A पहिल्यांदाच गुंतवणूक करणाऱ्यांवर लक्ष केंद्रित करतो तर भाग B नियोक्त्यांवर लक्ष केंद्रित करतो. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत (EPFO) पहिल्यांदा नोंदणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लक्षात घेऊन, भाग अ अंतर्गत १५,००० रुपयांपर्यंतचे एका महिन्याचे ईपीएफ योगदान दोन हप्त्यांमध्ये उपलब्ध असेल. फक्त १ लाख रुपयांपर्यंत मासिक वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल. पहिला हप्ता सहा महिन्यांच्या नोकरीनंतर तर दुसरा हप्ता १२ महिन्यांच्या सेवेनंतर आणि आर्थिक साक्षरता कार्यक्रम पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळेल. PM Viksit Bharat Rojgar Yojana
बचत करण्याची सवय लावण्यासाठी, या प्रोत्साहन रकमेचा एक भाग निश्चित कालावधीसाठी बचत साधन किंवा ठेव खात्यात ठेवला जाईल आणि नंतर कर्मचारी तो काढू शकतील. पहिल्यांदाच नोकरी शोधणाऱ्यांना आधार ब्रिज पेमेंट सिस्टम (ABPS) वापरून DBT (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) मोडद्वारे पैसे दिले जातील, तर नियोक्त्यांना त्यांच्या पॅन-लिंक्ड खात्यांमध्ये थेट पैसे दिले जातील