सर्पदंशाने एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं तुम्ही अनेकदा वाचलं किंवा पाहिलंही असेल. साप समोर आल्यानंतर अनेकांची भंबेरी उडते. अनेकदा सर्पमित्र साप समोर आल्यानंतर काहीही हालचाल न करता स्थिर उभं राहावं असा सल्ला देतात.
मात्र साप समोर दिसला की अनेकांना आता आपला मृत्यूच जवळ आल्याची भीती वाटते आणि मग त्यातून धावपळ किंवा त्याला मारण्याचा प्रयत्न केला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का, साप जितका विषारी असतो तितकाच माणुसही असतो. जर माणसाने सापाचा चावा घेतला तर सापाचा मृत्यू होण्याची शक्यता असते. नेमकी अशीच एक घटना समोर आली आहे, ज्यामध्ये एका वर्षाच्या मुलाने चावा घेतल्याने कोब्राचा मृ्त्यू झाला आहे.
एखाद्या लहान मुलासमोर कोब्रा आला तर घरातील सर्वच जण घाबरतील. पण लहान मूल असल्याने त्याला तो साप आहे की खेळणं हे कळणार नाही. नेमकी अशीच घटना बिहारमध्ये घडली आहे. यावेळी सापाने खेळणं समजून कोब्राचा चावा घेतला असता त्याचा मृत्यू झाला.
मूल अंगणात खेळत असताना कोब्रा वारंवार त्याच्या हाताभोवती येत होता. यानंतर मुलाने त्या कोब्राचा चावा घेतला. मुलाने चावा घेतल्यानंतर कोब्राचा मृत्यू झाला. गोविंदा असं या मुलाचं नाव असून तो बेशुद्ध पडला होता. त्याचा त्याच अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आलं होतं.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, साप खूप जवळ आला होता. यामुळे कदाचित बाळाला त्रास होत असावा. प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, मुलाने त्याचे दातात रुतवले होते, ज्यामुळे सापाचा लगेच मृत्यू झाला.
काही तासांनंतर, गोविंदाची प्रकृती बिघडू लागली. त्याच्या कुटुंबाने प्रथम त्याला जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात (PHC) नेले, जिथून त्याला बेतिया येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (GMCH) रेफर करण्यात आले.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, मूल सध्या स्थिर असून त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे.
मुलाची आजी मातेश्वरी देवी म्हणाल्या की, गोविंदाची आई जवळच लाकूड गोळा करत होती तेव्हा साप दिसला. “साप बाहेर आला आणि मुलाने त्याला काहीतरी फेकून मारले. यानंतर चावून मारले. तो एक गेहुआन (कोब्रा) होता. बाळ फक्त एक वर्षाचे आहे,” असं ती म्हणाली.