अपघातात जखमी झालेल्या पोलिस हवालदाराचा मृत्यू
मानोरा येथील पोलीस हवालदार अमोल राठोड (वय 39 ) यांचा दोन दिवसांपूर्वी वाशिम येथे त्यांचा अपघात झाला होता त्यांना अकोला येथे पुढील उपचाराकरिता रवाना केले होते. मात्र आज दिनांक २८ रोजी त्यांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला.
अमोल राठोड यांचे वडील सुद्धा पोलिस खात्यात होते. आसेगाव पोलिस स्टेशन मध्ये कार्यरत असताना त्यांचेही अपघाती निधन झाले होते. त्यांच्या जागी अमोल यांची अनुकंपा मध्ये पोलिस खात्यात नियुक्ती झाली होती. वडील आणि आता मुलग्याचेही अपघाती निधन झाल्याने कुटुंबियांवर मोठा आघात झाला आहे. त्यांच्या मागे त्याची आई, पत्नी मुलगा मुलगी असा परिवार आहे