Thursday, August 7, 2025
Homeब्रेकिंगदहावीतील मुलीवर लॉजवर अत्याचार : दोन मित्रही अडकले

दहावीतील मुलीवर लॉजवर अत्याचार : दोन मित्रही अडकले

दहावीत शिकणाऱ्या एका मुलीला कारमधून लॉजवर नेण्यात आले. त्याठिकाणी तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केल्याच्या आरोपावरून शाहूपुरी पोलिस ठाण्यात एका २५ वर्षीय तरुणावर अत्याचारासह पॉक्सोचा गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना शनिवारी (दि. २) दुपारी दोनच्या सुमारास साताऱ्यात घडली.

 

याबाबत पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, खटाव तालुक्यातील एका गावात २०२३ मध्ये आठवी इयत्तेत शिकत असल्यापासून आरोपीने पाठलाग करून ‘तू माझ्याशी बोल, नाहीतर मी तुझ्या घरच्यांना मारून टाकीन,’ अशी धमकी देत होता.

 

त्यानंतर २ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी आरोपीने मला फोन करून सातारा शहरातील एका चौकात बोलावले. त्यावेळी चारचाकीमध्ये आरोपीचे दोन मित्रही होते. मला गाडीत बसण्यास सांगितल्यानंतर मी बसले. कार पोवई नाका परिसरात नेण्यात आली. तेथे एका लॉजजवळ गाडी उभी करण्यात आली. लॉजच्या पार्किंगमध्ये आरोपीने अश्लील कृत्य केले. त्यानंतर लॉजमध्ये नेऊन कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देऊन अत्याचार केला. संबंधित मुलगी अल्पवयीन आहे. हे माहीत असतानाही मित्रासोबत गेल्याने त्या दोन मित्रांवरील पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -