Sunday, August 10, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजी : शिवाजीनगर पोलिसांचा 'येथे' छापा... मिळालं असं काही..

इचलकरंजी : शिवाजीनगर पोलिसांचा ‘येथे’ छापा… मिळालं असं काही..

येथील जवाहरनगर परिसरातील एका पानपट्टीवर शिवाजीनगर पोलिसांनी छापा टाकून विविध प्रकारचा पानमसाला, गुटखा, सुंगधी तंबाखू सुपारीसह ओला व सुका मावा असा ९ हजार ९६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

यामध्ये पानपट्टी चालक सुनिल मारुती बिरंजे (वय ३९ रा. जवाहरनगर ) याला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल सद्दाम गजबरसाब सनदी यांनी फिर्याद दिली आहे.

इचलकरंजी: होड्यांच्या शर्यती थरारक क्षण : Video पहा

हुपरी परिसर पुन्हा हादरला; तळंदगे येथे पुरलेले अर्भक आढळून आल्याने खळबळ

सोमवारपासून अतिमुसळधार पाऊस, 11 राज्यांना हायअलर्ट, महाराष्ट्राबाबात मोठी बातमी

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, जवाहरनगर परिसरातील गणेश मंदिरच्या पाठीमागे सुनिल बिरंजे याची पानपट्टी आहे. याठिकाणी सुगंधी सुपारी, तंबाखू, विविध कंपन्यांचा गुटखा व मावा याचा साठा असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली.

त्यानुसार त्याठिकाणी छापा टाकला असता विविध कंपन्यांचा गुटखा, पानमसाला, सुगंधी तंबाखू, सुपारी, ओला व सुका मावा तयार करण्याचे साहित्य असा ९ हजार ९६ रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. संपूर्ण मुद्देमालासह सुनिल बिरंजे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

महिलांसाठी सरकारची नवी योजना!! 100 टक्के अनुदान मिळणार

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -