Saturday, August 23, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजी : संजय गांधी निराधार योजनाचे थकीत अनुदान ताबडतोब द्या

इचलकरंजी : संजय गांधी निराधार योजनाचे थकीत अनुदान ताबडतोब द्या

इचलकरंजी संजय गांधी निराधार योजना आणि राष्ट्रीय कुटुंब लाभयोजनेतील लाभार्थ्यांचे अनुदान आठ महिन्यांपासून थकीत आहे. ते ताबडतोब वितरीत करावे, अशा मागणीचे निवेदन इचलकरंजी शहर काँग्रेसच्यावतीने पुरवठा कार्यालयात देण्यात आले.

अंगारकी संकष्टीनिमित्त पंचगंगा वरद विनायक मंदिरात विविध कार्यक्रम

आजचे राशीभविष्य 11 August 2025

विधानसभा निवडणूक झाल्यापासून संजय गांधी निराधार योजनेसह इतर योजनांचे पैसे नियमित मिळत नाहीत. त्यामुळे लाभार्थ्यांना वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत.

आता सरकारी बँकेत नोकरी मिळणं सोप्पं… ‘या’ बँकांमध्ये तब्बल 17000 हून अधिक पदांसाठी भरती!

तसेच त्यांना योग्य माहिती न देता उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. गेल्या आठ महिन्यांपासून निराधार योजनेचे पैसे मिळालेले नाहीत. याबाबत त्वरित हालचाली न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी अजित मिणेकर, राजन मुठाणे, हारूण खलिफा, सुदाम साळुंखे, शेखर पाटील, निराधार योजनेचे लाभार्थी आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -