Sunday, August 24, 2025
Homeक्रीडाभावना खूप आहेत, पण., पूर्व पत्नी धनश्रीच्या वक्तव्यावर युजवेंद्र चहलची लक्षवेधी पोस्ट

भावना खूप आहेत, पण., पूर्व पत्नी धनश्रीच्या वक्तव्यावर युजवेंद्र चहलची लक्षवेधी पोस्ट

भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटपटू युजवेंद्र चहल त्याच्या प्रोफशनल आयुष्यापेक्षा जास्त खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. कोरिओग्राफर धनश्री वर्मा हिच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर युजवेंद्र त्याच्या खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत आला.

 

दरम्यान, नुकताच झालेल्या एका मुलाखतीत, धनश्री हिने अनेक गोष्टींचा खुलासा केला. ज्यावर युजवेंद्र याने देखील सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. घटस्फोटाच्या 5 महिन्यांनंतर धनश्री आणि युजवेंद्र यांच्या नात्याची तुफान चर्चा रंगली आहे.

 

नुकताच झालेल्या मुलाखतीत धनश्रीनेखुलासा केला की, कशा प्रकारे ती घटस्फोटासाठी घरातून तयार होऊन निघाली होती. पण जेव्हा न्यायालयाने निकाल सांगितला तेव्हा धनश्री डोळ्यातील पाणी थांबवू शकली नाही. मोठ-मोठ्याने कोर्टातच रडू लागली. एवढंच नाहीतर, युजवेंद्र याच्या टी-शर्टवर लिहिलेल्या “Be Your Own Sugar Daddy” यावर देखील धनश्रीने मोठा खुलासा केला आहे,

 

“Be Your Own Sugar Daddy” यावर सडेतोड उत्तर देत धनश्री म्हणाली, ‘Be Your Own Sugar Daddy… असं मला मेसेज करुन देखील म्हणाला असता. टी-शर्टवर लिहिण्याची काय गरज होती…गोष्टी परिपक्वतेने हाताळल्या पाहिजेत.’ असं देखील धनश्री म्हणाली…

 

धनश्री हिने केलेल्या वक्तव्यानंतर युजवेंद्र याने देखील सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत स्वतःच्या भावना व्यक्त केल्या आहेत. स्वतःचा फोटो पोस्ट करत युजवेंद्र म्हणाला, ‘भावना खूप आहेत, पण शब्द शुन्य आहेत…’ सध्या युजवेंद्र याची पोस्ट देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

 

काय म्हणाली युजवेंद्र चहल?

 

धनश्री म्हणाली, ‘चहल कोर्टातुन निघून गेला. त्यानंतर ती मागच्या गेटने बाहेर आली…. कोर्टाच्या बाहेर आल्यानंतर धनश्री प्रचंड भावूक झाली होती. पण जेव्हा तिने फोन पाहिला तेव्हा युजवेंद्रच्या टी-शर्टबद्दल कळलं… तेव्हा धनश्री म्हणाली, ‘याने खरंच असं केलं आहे…’

 

युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचं लग्न…

 

अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर धनश्री आणि युजवेंद्र यांनी एकमेकांना डेट केलं आणि 22 डिसेंबर 2020 मध्ये लग्न केलं. पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी परस्पर सहमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला.20 मार्च 2025 मध्ये वांद्रे हायकोर्टात दोघांच्या घटस्फोटावर निकाल सुनावण्यात आला. आता दोघे कायम सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत स्वतःच्या मनातील भावना व्यक्त करत असतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -