Saturday, August 23, 2025
Homeमहाराष्ट्रफेसबुकमुळे प्रेमात पडले, देवळात लग्नही ! सासरी गेल्यावर…

फेसबुकमुळे प्रेमात पडले, देवळात लग्नही ! सासरी गेल्यावर…

उत्तर प्रदेशातील सोनभद्रमध्ये एक अनोखं प्रकरण समोर आलं आहे. फेसबुकवर झालेली मैत्री(friendship) प्रेमात बदलली, त्यातून लग्नापर्यंत मजल गेली. पण लग्नानंतर पतीने पत्नीला नांदवण्यास नकार दिल्याने तरुणी थेट सासरच्या घरासमोर आंदोलनाला बसली.झारखंडमधील बोकारो जिल्ह्याची रहिवासी खुशबू कुमारी आणि एनसीएलमध्ये काम करणारा शशी कुमार यांची ओळख फेसबुकवर झाली होती. काही वर्षांच्या प्रेमानंतर त्यांनी 12 मे 2025 रोजी हजारीबागला पळून जाऊन लग्नाचा निर्णय घेतला.

 

कुटुंबीयांच्या विरोधामुळे पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि अखेर पोलिस स्टेशनजवळील शिवमंदिरात दोघांचे लग्न लावण्यात आले. त्यानंतर बर्मो येथील मंदिरात त्यांची विवाह नोंदणीही झाली.लग्नानंतर शशी कुमारने पत्नीला काही दिवस आपल्या क्वार्टरमध्ये ठेवले, पण नंतर तिला माहेरी सोडले. बराच वेळ लोटल्यानंतरही तो तिला परत आणायला गेला नाही, शिवाय तिचे फोनसुद्धा उचलणे बंद केले.

 

पतीच्या या वागण्यामुळे त्रस्त झालेल्या खुशबूने थेट सोनभद्र येथे सासरच्या घरासमोर आंदोलन सुरू केले. तिचा आरोप आहे की, पतीने तिला नांदवण्यास नकार दिला असून दुसरे लग्न करण्याची तयारी केली आहे.स्थानिकांच्या गर्दीत अखेर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. अनपारा पोलिस स्टेशनचे प्रभारी शिव प्रताप वर्मा यांनी सांगितले की, “तरुणीने शशी कुमारविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पती पोलिस स्टेशनला हजर झाला नाही. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -