बीडमध्ये गुन्हेगारीच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नाहीयेत, आता पुन्हा एकदा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महिला होमगार्डच्या हत्येनं जिल्हा हादरला आहे. प्रेमसंबंधातून ही हत्या झाल्याची माहिती समोर येत आहे. मैत्रिणीनेच आपल्या मैत्रिणीची हत्या केली आहे. अयोध्या व्हरकटे असं या प्रकरणातील मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे, तर वृंदावनी फरताळे असं आरोपी महिलेचं नाव आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, बीडमधील होमगार्ड अयोध्या व्हरकटे या गेल्या काही दिवसांपूर्वी बेपत्ता असल्याची तक्रार बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. यावरून पोलिसांनी शोध घेतला असता त्यांचा मृतदेह बीड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत आढळून आला. यानंतर तिचीच मैत्रीण वृंदावनी फरताळे हिची चौकशी केली असता तिनेच ही हत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे. हत्येनंतर वृंदावनी फरताळे हिने मुलाच्या मदतीने अयोध्या यांचा मृतदेह एका नाल्यात फेकून देत त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला.
प्रकरण समोर येताच पोलिसांनी आरोपी महिला वृंदावनी फरताळे हिला अटक केली आहे. मैत्रिणीनेच ही हत्या केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या दोन्ही महिलांचे एकाच व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते, यातूनच ही हत्याकांड झाली असावी असा प्राथमीक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. दरम्यान घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
दरम्यान ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालं आहे. सीसीटीव्हीचं फुटेज समोर आलं आहे. दोन दिवसांपूर्वी वृंदावनी फरताळे हिने अयोध्या व्हरकटे यांची हत्या केली होती, या दोन्ही महिलांचे एकाच व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते, त्यातूनच ही हत्या झाल्याची चर्चा आहे. दरम्यान हत्येनंतर वृंदावनी फरताळे मृतदेह एका बॉक्समध्ये घेऊन जातानाचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं आहे. पोलिसांनी आता या घटनेचा कसून तपास सुरू केला आहे, ज्या बिल्डिंगमधील रूममध्ये ही हत्या झाली तिथे पोलिसांकडून तपास सुरू आहे.