कोल्हापूर येथे दोन समुदांयामध्ये हिंसक संघर्ष झाल्याची घटना समोर आली आहे. काल, म्हणजेच 22 ऑगस्ट शुक्रवारी हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. तेव्हा जिल्ह्यातील सिद्धार्थ नगर भागात संध्याकाळी दोन समुदायांमध्ये झालेला किरकोळ वाद पाहता पाहता वाढला आणि त्याचे रूपांतर हिंसक संघर्षात झाले. यावेळी झालेल्या दगडफेकीत अनेक लोक जखमी झाले तसेच तेथील अनेक वाहनांचेही बरेच नुकसान झाले.
नेमकं काय घडलं ?
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूरच्या सिद्धार्थ नगरमध्ये नमाजानंतर वाद झाला, ज्यामुळे वातावरण बिघडले. दगडफेकीत अनेक लोक जखमी झाले आणि वाहनांचे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळ गाठून पोलिसांनी तात्काळ बळ तैनात करून ही परिस्थिती नियंत्रणात आणली.
या घटनेनंतर आसपासच्या परिसरात तणावाचे वातावरण होतं, पण पोलिसांनी त्या परिस्थितीवर वेगाने नियंत्रण मिळवलं. सीपीआर हॉस्पिटलजवळ गैरसमजुतीमुळे दोन समुदायांमध्ये वाद झाला, असं कोल्हापूरचे एसपी योगेश कुमार गुप्ता म्हणाले. “दोन्ही बाजूंच्या वरिष्ठ नेत्यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले असून आणि सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे” असेही त्यांनी नमूद केलं.
पोलिस आणि प्रशासनाचे आवाहन
याप्रकरणानंतर पोलिसांनी कोल्हापूरमधील जनतेला आवाहन केलं आहे. अफवांकडे लक्ष देऊ नका आणि सोशल मीडियावर प्रक्षोभक संदेश पसरवू नका असे आवाहन पोलिसांद्वारे करण्यात आलं आहे. या घटनेनंतर प्रशासनाने परिसरात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार, या प्रकरणाची चौकशी सुरू करण्.यात आली असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.
बातमी अपडेट होत आहे.