तु्म्ही जर व्होडाफोन-आयडियाचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी खास बातमी आहे. कंपनीचा 4999 रुपयांचा रिचार्ज प्लॅन तुम्हाला 1 रुपयांत मिळू शकतो. या खास प्लॅनची वैधता 365 दिवसांची आहे. कंपनीने त्यांच्या अधिकृत ब्लॉग पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली आहे. महत्वाची बाब म्हणजे व्होडाफोन-आयडियाने काही काळापूर्वी देशातील अनेक शहरांमध्ये 5जी सेवा सुरू केली आहे. आता कंपनी आगामी काळात संपूर्ण देशात ही सेवा सुरु करणार असल्याचीही माहिती समोर आली आहे.
काय आहे ऑफर ?
व्होडाफोन-आयडियाने आपल्या ब्लॉग-पोस्टमध्ये म्हटले आहे की, युजर्स VI अॅपद्वारे या ऑफरचा फायदा घेऊ शकतात. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी अॅप उघडल्यानंतर गॅलेक्सी शूटर्स गेम लाँच करावे लागेल. यात युजर्सना ड्रोन खाली पाडून जेम्स गोळा करावे लागणार आहे. जास्तीत जास्त जेम्स गोळा केल्यानंतर युजर्सना 1 रुपयांत 4999 रुपयांचा वार्षिक रिचार्ज प्लॅन जिंकण्याची संधी मिळणार आहे.
VI कंपनीने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले की, 25 जेम्स जिंकणाऱ्या ग्राहकाला 50 रुपयांचे अमेझॉन गिफ्ट व्हाउचर मिळेल. एकूण 300 विजेत्यांना याचा लाभ घेता येईल. तसेच 75 जेम्स जिंकणाऱ्यांना 1 रुपयांत 10 जीबी डेटा आणि व्ही मूव्हीज अँड टीव्ही अॅपद्वारे 16 ओटीटी अॅप्सचा अॅक्सेस दिला जाईल. मात्र फक्त 30 विजेत्यांनाच याचा फायदा घेता येणार आहे.