‘पवित्र रिश्ता’ मालिकेतून चाहत्यांच्या भेटीस आलेली अभिनेत्री प्रिया मराठे हिचं निधन झालं आहे. अभिनेत्रीच्या निधनाची माहिती समोर आली आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. वयाच्या 38 व्या वर्षी प्रिया हिचं निधन झालं आहे. कर्करोगाशी झुंज लढत असाना प्रिया मराठे हिने रविवारी पहाटे चार वाजता अखेरचा श्वास घेतल्याची माहिती समोर येत आहे. प्रिया हिच्या निधनानंतर अभिनेत्रीच्या जुन्या आठवणी डोळ्यासमोर उभ्या राहत आहेत.
प्रिया मराठे हिने एका मुलाखतीत तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. पती शंतनू तिला कोणत्या नावाने आणि लाडाने हाक मारतो याबद्दल देखील प्रियाने सांगितलं होतं. शुंतनू तुला कोणत्या नावाने प्रेमाने हाक मारतो? असा प्रश्न विचारला होता.
यावर प्रिया म्हणालेली, ‘शंतनू मला प्रेमात जान म्हणतो…’ सांगायचं झालं तर, प्रिया आणि शंतनू यांचं लव्हमॅरेज होतं. एका मित्रामुळे दोघांची ओळख झाली आणि ओळखीचं रुपांतर अखेर प्रेमात झालं आणि प्रिया आणि शंतनू यांनी कुटुंबियांच्या सहमतीने लग्न केलं.
प्रिया कायम पतीसोबत सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ देखील पोस्ट करायची. पण अभिनेत्रीच्या नशिबात काही दुसरंच लिहिलं होतं. प्रिया हिची शेवटची पोस्ट गेल्या वर्षाची होती. गेल्या अनेक महिन्यांपासून प्रिया सोशल मीडियावर सक्रिय देखील नव्हती…
मिळालेल्या माहितीनुसार, प्रिया ‘तुझेच मी गीत गाते’ मालित मोनिका ही भूमिका साकारत होती. पण अभिनेत्रीने मध्येच मालिकेचा निरोप घेतला. मालिकेतून निरोप घेत असल्याचा व्हिडीओ देखील प्रियाने सोशल मीडियावर पोस्ट केला होता. प्रकृती स्थिर नसल्यामुळे तिने मालिकेतून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला होता. आता अभिनेत्रीच्या निधनाची माहिती समोर आल्यानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे.
प्रिया सोशल मीडियावर कायम सक्रिय असायची. अनेक मराठी मालिका आणि सिनेमांमध्ये देखील अभिनेत्रीने महत्त्वाची भूमिका बजावली होती. प्रियाने ‘पवित्र रिश्ता’, ‘कसम से’, ‘बडे अच्छे लगते हैं’, ‘साथ निभाना साथिया’ या हिंदी मालिकांमध्ये आणि ‘या सुखांनो या’, ‘चार दिवस सासूचे’, ‘तू तिथे मी’ यांसारख्या मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती. पण आता प्रिया सर्वांना रडवून गेली आहे.