Thursday, November 13, 2025
Homeब्रेकिंगसप्टेंबरमध्ये किती दिवस बँका बंद? तारखेनुसार संपूर्ण यादी पहा

सप्टेंबरमध्ये किती दिवस बँका बंद? तारखेनुसार संपूर्ण यादी पहा

ऑगस्ट महिना संपला असून आजपासून सप्टेंबर महिना सुरु झाला आहे. सप्टेंबर महिन्यात तुमचं बँकेत काही काम असेल, कर्जाची प्रक्रिया असेल किंवा अन्य काही कामे असतील तर हि बातमी खास तुमच्यासाठी आहे. दर महिन्याप्रमाणे सप्टेंबर महिन्यात सुद्धा बँकांना अनेक दिवस सुट्ट्या आहेत. रिजर्व बँक ऑफ इंडियाने याबाबतची यादी जाहीर केली आहे. सप्टेंबर महिन्यात अनेक सण उत्सव असल्याने सुट्ट्यांची हि यादी पाहूनच तुम्ही बँकेत जावा, नाहीतर तुमचा फुकटचा हेलफाटा होऊ शकतो.

 

कोणकोणत्या दिवशी बँकांना सुट्टी ? Bank Holidays In September 2025

३ सप्टेंबर – कर्मपूजेमुळे रांची आणि पटना येथे बँका बंद राहतील.

४ सप्टेंबर – पहिल्या ओणममुळे त्रिवेंद्रम आणि कोची येथील बँका बंद राहतील.

५ सप्टेंबर – ईद-ए-मिलाद/मिलाद-उन-नबी/तिरुवोनम/मिलाद-ए-शरीफ निमित्त दिल्ली, मुंबईसह देशातील अनेक शहरांमध्ये बँका बंद राहतील.

६ सप्टेंबर – ईद-ए-मिलादमुळे जम्मू, श्रीनगर आणि गंगटोकमध्ये बँका बंद राहतील.

७ सप्टेंबर – रविवार निमित्त देशभरातील बँकांना सुट्टी असेल.

१२ सप्टेंबर – ईद-ए-मिलादनंतर शुक्रवार, ज्यामुळे जम्मू आणि श्रीनगरमधील बँका बंद राहतील.

१३ सप्टेंबर – महिन्याच्या दुसऱ्या शनिवार निमित्त देशभरातील बँका बंद राहतील.

१४ सप्टेंबर – रविवार निमित्त देशभरातील बँकांना सुट्टी असेल.

२१ सप्टेंबर – रविवार निमित्त देशभरातील बँकांना सुट्टी असेल.

२२ सप्टेंबर – नवरात्र स्थापना निमित्त जयपूरमधील बँका बंद राहतील.

२३ सप्टेंबर – महाराजा हरि सिंह जयंतीनिमित्त जम्मूमधील बँका बंद असतील .

२७ सप्टेंबर – महिन्याचा चौथा शनिवार असल्याने देशातील सर्व बँका बंद राहतील.

२८ सप्टेंबर – रविवारच्या सुट्टीमुळे देशभरातील बँका बंद राहतील.

२९ सप्टेंबर – महासप्तमी/दुर्गा पूजा असल्याने कोलकाता, गुवाहाटी आणि श्रीनगरमध्ये बँका बंद राहतील.

३० सप्टेंबर – महाअष्टमी/दुर्गा पूजा असल्याने कोलकाता, त्रिपुरा आणि भुवनेश्वरसह अनेक ठिकाणी बँकांना सुट्टी असेल.

 

आजकाल मोबाईल वरून बँकेची कितीही कामे ऑनलाईन होत असली तरी बँकेत कोणत्या ना कोणत्या कारणाने जावं लागतच. बँकेत जायच म्हंटल कि अक्खा दिवस जातो, त्यामुळे सप्टेंबर महिन्यात बँकेत जाण्यापूर्वी आधी वरील सुट्ट्याची यादी पहा आणि मगच बँकेत जावा. या सुट्ट्यांच्या कालावधीत (Bank Holidays In September 2025) बँक शाखा बंद राहिल्यामुळे चेक क्लिअरन्स, RTGS आणि NEFT सारख्या सेवांना विलंब होऊ शकतो. परंतु ऑनलाइन बँकिंग आणि एटीएमद्वारे पैसे काढणे किंवा बिल पेमेंटसारखे व्यवहार शक्य होतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -