सरकारने 56 व्या GST परिषदेच्या बैठकीत 12 आणि 28 टक्क्याचे 2 टॅक्स स्लॅब संपवलेत. आता फक्त दोन टॅक्स स्लॅब आहेत. 5 टक्के आणि 18 टक्के. हे नवीन रेट्स 22 सप्टेंबर 2025 पासून लागू होणार आहेत. याचा सर्वाधिक परिणाम देशातील सर्वाधिक विकली जाणारी बाइक Hero Splendor आणि स्कूटर मार्केटमध्ये Honda Activa च्या किंमतीवर होणार आहे. जर, तुम्ही नवीन बाईक विकत घेण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. नवीन जीएसटी दर लागू झाल्यानंतर नव्य बाइकसाठी तुम्हाला किती रक्कम मोजावी लागेल, हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
350 सीसी पेक्षा कमी इंजिन्सच्या बाइकवर जीएसटी 28 टक्क्यांनी घटवून 18 टक्के करण्यात आला आहे. यात सर्वसामान्यांच्या पसंतीच्या बाईक्स जसं की, बजाज पल्सर किंवा होंडा अॅक्टिवा पहिल्यापेक्षा अजून स्वस्त होणार आहेत.
कुठल्या बाइक महागणार?
जर, तुम्ही तुमच्यासाठी एक नवीन 350 सीसीपेक्षा मोठी बाइक खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर रॉयल एनफिल्ड सारख्या क्रूजर बाइकवर आता 40 टक्के जीएसटी लागेल. आधी या बाइक्सवर 28 टक्के जीएसटी लागायचा आणि 3-5 टक्के सेस होता. एकूण मिळून 32 टक्के टॅक्स लागायचा. आता हा सेस हटवण्यात आला असून 40 टक्के फ्लॅट टॅक्स लावला आहे.
याचा फायदा दोन वर्गांना
सरकारचा हा निर्णय फक्त मध्यम वर्गालाच दिलासा देणार नाही, तर ऑटोमोबाइल इंडस्ट्रीला सुद्धा चालना मिळेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार येणाऱ्या सणांच्या काळात टू-व्हीलर सेल आणखी वाढेल. कारण लोक नव्या वाहन खरेदीचा विचार करु शकतात. एक उदहारण म्हणून सांगतो. नवीन जीएसटी दर लागू झाल्यानंतर हीरो स्प्लेंडर प्लसची किंमत किती होईल. दिल्लीत हीरो स्प्लेंडर प्लसची एक्स-शोरूम किंमत सध्या 79,426 रुपये आहे. जर, या बाइकवर जीएसटीत 10 टक्के कपात लागू झाली, तर बाईकची किंमत 7,900 रुपयांनी कमी होईल. याचा थेट फायदा ग्राहकांना होईल.
ऑन-रोड किंमत किती?
बाइकच्या एक्स-शोरूम किंमतीशिवाय 6,654 रुपये आरटीओ शुल्क, 6,685 रुपये इंश्योरेंस प्रीमियम आणि जवळपास 950 रुपये दुसरा चार्ज असतो. या सगळ्या किंमती जोडल्यानंतर दिल्लीत स्प्लेंडर प्लसची ऑन-रोड किंमत जवळपास 93,715 रुपये होते. टॅक्स कमी केल्याचा परिणाम पूर्णपणे लागू झाला, तर आधीपेक्षा या बाईक अजून स्वस्त होतील.