Saturday, September 6, 2025
Homeब्रेकिंगअंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच खोकला आला अन् तरुण जिवंत झाला

अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच खोकला आला अन् तरुण जिवंत झाला

अंत्यविधीची तयारी सुरू असतानाच तरुणाला खोकला आला आणि त्याला पुन्हा एकदा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या त्रंबकेश्वर तालुक्यात उघडकीस आली आहे.

 

भाऊ लचके असं या तरुणाचं नाव असून तो 19 वर्षांचा आहे.

 

नेमकं प्रकरण काय?

 

चार दिवसांपूर्वी त्रंबकेश्वर तालुक्यातील दुचाकी घसरून झालेल्या अपघातात डोक्याला मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला होता. नातेवाईकांनी त्याला त्रंबकेश्वरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले तिथून त्याला अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्याच्या सूचना दिल्यात, मात्र बेड शिल्लक नसल्याचे कारण देत जिल्हा रुग्णालयात त्याला दाखल केले नाही, अखेर गोर गरीब आदिवासी कुटुंबीय रुग्णाला आडगावच्या डॉ वसंत पवार मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेत तिथे तीन दिवस उपचार केल्यानंतर नातेवाईक रुग्णला थेट आपल्या गावी घेऊन गेलेत. डॉ वसंत पवार रुग्णालय प्रधासानने मेंदूमृत (ब्रेनडेड) झालाय. त्यामुळे तुम्ही रुग्णला घरी घेऊन जा किंवा इथेच राहुद्या असे सांगितल्याने आम्ही घरी घेऊन गेलो असा दावा रुग्णांच्या नातेवाईकांनी केलाय. मेंदूमृत याचा अर्थ रुग्णाचा मृत्यू झाला असा समज झाल्यानं अंत्यविधीची तयारी करण्यात आली. मात्र त्याला खोकला आल्यानं त्याची हालचाल झाली आणि तो जिवंत असल्याचे कळाले आणि पुन्हा भाऊ लचके याला रुग्णालयात दाखल केल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली.

 

रुग्णाचे नातेवाई गंगाराम शिदे काय म्हणाले?

 

सध्या भाऊ लचकेवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्याची प्रकृती चिंताजनक आहे, तो व्हेंटिलेटरवर आहे. त्याच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली असल्याने त्यावर सध्या शस्त्रक्रिया करता येणार नाही. पर्यायी उपचार सुरू आहेत. परंतु रुग्ण ब्रेनडेड नसल्याचा निर्वाळा जिल्हा प्रशासनाने केल्यानं यातील ट्विस्ट आणखीनच वाढला आहे. त्याच बरोबर ज्या रुग्णालयातुन त्याला डिस्चार्ज देण्यात आला. त्यावर कोणते उपचार करण्यात आलेत, डिस्चार्ज देताना काय कारण देण्यात आले, याबाबतीत कुठलीच माहिती नसल्याचा जिल्हा रुग्णालयाचा दावा असून याबाबतीत सबंधित यंत्रणाकडून चौकशी केली जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

 

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ चारुदत्त शिंदे काय म्हणाले?

 

डॉ वसंत पवार हॉस्पिटल प्रशासनाने रुग्णांच्या नातेवाईकांचे दावे फेटाळून लावले आहेत. रुग्णाचे नातेवाईकच आम्ही रुग्णला अधिक उपचारासाठी घेऊन जातो, असे सांगून घेऊन गेले, असं जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांनी सांगितले.

 

भाऊ लचके याची नशिबाची दोरी बळकट-

 

रुग्णाचे आणि त्याचे नातेवाईक आदिवासी पाड्यावरील आहेत, त्यामुळे तिथे शिक्षण आणि वैद्यकीय सुविधांचा अभाव आहे, त्याच परिस्थितीत ते आपल्या रुग्णाचे जीव वाचविण्यासाठी नाशिक शहरात आलेत. मात्र रुग्णालय प्रधासन आणि रुग्णाचे नातेवाईक यांच्यात सुसंवादाचा अभाव, ग्रामीण भागातून आदिवासी पाड्यावरून आलेल्या नातेवाईकांना योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने संभ्रम निर्माण झाला, भाऊ लचके याची नशिबाची दोरी बळकट होती. त्यामुळे अंत्यसंस्कारची तयारी सुरू असताना त्याला खोकला आला आणि तो जिवंत असल्याचे लक्षात आले, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -