महाराष्ट्रातील लाखो लाभार्थी महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा(scheme) ऑगस्ट महिन्याचा हप्ता आजपासून थेट महिलांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची घोषणा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली आहे.
आदिती तटकरे यांनी ट्विट करत म्हटले आहे की,
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना(scheme) : महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती! या योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात होत आहे. लवकरच आधार संलग्नित खात्यात १५०० रुपये जमा केले जातील.”
३-४ दिवसांत सर्वांच्या खात्यात १५०० रुपये
ऑगस्टचा हप्ता उशिरा मिळणार का, या प्रश्नाने अनेक महिला चिंताग्रस्त होत्या. मात्र आता दिलासा मिळाला आहे. आजपासून पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून येत्या ३ ते ४ दिवसांत सर्व पात्र महिलांच्या खात्यात १५०० रुपयांचा सन्मान निधी जमा होईल.
३४४ कोटी रुपयांचा निधी वर्ग
या योजनेसाठी सरकारकडून तब्बल ३४४ कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. सप्टेंबर महिन्यात १० दिवस उलटूनही ऑगस्टचा हप्ता न मिळाल्याने महिलांमध्ये नाराजी होती. पण आता निधी वितरित होण्यास सुरुवात झाली असल्याने महिलांना दिलासा मिळाला आहे.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वाची योजना
‘माझी लाडकी बहीण’ योजना ही महिलांच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण ठरत असून राज्यभरात लाखो महिला या योजनेतून लाभ घेत आहेत.