Tuesday, September 16, 2025
Homeक्रीडामहारविवार, टीम इंडियाचे 14 सप्टेंबरला 2 सामने, एक पाकिस्तान विरुद्ध, दुसरा कुणासोबत?

महारविवार, टीम इंडियाचे 14 सप्टेंबरला 2 सामने, एक पाकिस्तान विरुद्ध, दुसरा कुणासोबत?

अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर 9 सप्टेंबरपासून आशिया कप 2025 स्पर्धेला सुरुवात झालीय. या स्पर्धेत आतापर्यंत 2 सामने खेळवण्यात आले आहेत. अफगाणिस्तानने सलामीच्या सामन्यात हाँगकाँगवर मात केली. तर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने यूएईवर विजय मिळवला. तर तिसऱ्या सामन्यात 11 स्प्टेंबरला बांगलादेश विरुद्ध हाँगकाँग आमनेसामने आहेत. मात्र क्रिकेट चाहत्यांना भारत विरुद्ध पाकिस्तान या महामुकाबल्याचे वेध लागले आहेत. भारत-पाकिस्तान सामन्याची क्रिकेट चाहत्यांना कायमच प्रतिक्षा असते. मात्र यंदा क्रिकेट चाहत्यांना एकाच दिवशी क्रिकेटची डबल मेजवाणी असणार आहे.

 

रविवारी डबल धमाका

आशिया कप स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान रविवारी 14 सप्टेंबरला आमनेसामने असणार आहेत. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. टीम इंडियाचा 14 तारखेला आणखी एक सामना होणार आहे. मात्र हा सामना वूमन्स टीम इंडियाचा असणार आहे. अशाप्रकारे रविवारी क्रिकेट चाहत्यांना टीम इंडियाचे 2 सामने पाहायला मिळणार आहेत.

 

 

दोन्ही सामन्यांना किती वाजता सुरुवात होणार?

आशिया कप स्पर्धा टी 20 फॉर्मेटने होत आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. तर वूमन्स टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेलाही 14 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. उभयसंघात 14 ते 20 सप्टेंबर दरम्यान एकूण 3 सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया भारत दौऱ्यावर येणार आहे. पहिला एकदिवसीय सामना हा मुल्लानपूरमधील महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. हरमनप्रीत कौर भारतीय संघांचं नेतृत्व करणार आहे.

 

दोन्ही संघांसाठी निर्णायक मालिका

दरम्यान वूमन्स वनडे वर्ल्ड कप 2025 स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलिया आणि टीम इंडिया या दोन्ही संघांसाठी ही मालिका निर्णायक आणि महत्त्वाची ठरणार आहे. या मालिकेकडे वर्ल्ड कपची रंगीत तालीम म्हणून पाहिलं जात आहे. वनडे वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन हे 30 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर दरम्यान करण्यात आलं आहे. वर्ल्ड कपमधील सर्व सामने कोलंबो आणि भारतातील 4 शहरांमध्ये होणार आहेत.

 

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 14 सप्टेंबर, मुल्लानपूर

 

दुसरा सामना, 17 सप्टेंबर, मुल्लानपूर

 

तिसरा सामना, 20 सप्टेंबर, नवी दिल्ली

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -