एकत्रित काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवल्याप्रकरणी पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल निशिकांत कांबळे (वय ३० रा. कबनुर) असे त्याचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक करुन न्यायालयात हजर केले असता ५ दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी, विशाल कांबळे याने पिडीत महिलेशी लगट करत तिच्यासोबत मोबाईलवर काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत विशाल हा पीडितेशी वारंवार जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवत होता. १५ फेब्रुवारी ते २९ ऑगस्ट २०२५ या कालावधीत पिडीत महिलेच्या घरात, कबनुरमधील मराठी शाळेजवळ आणि कोंडीग्रे येथील रेडस्टोन लॉज येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर ठाण्यात विशाल कांबळे याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली.