Tuesday, September 16, 2025
Homeयोजनासरकारची नवी योजना! 15 सप्टेंबरला लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा होतील 10...

सरकारची नवी योजना! 15 सप्टेंबरला लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा होतील 10 हजार

केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्य, त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत.

 

केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्य, त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत.

 

महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जाता. दुसरीकडे बिहार सरकारकडून निवडणुकीच्या तोंडावर महिलांसाठी खास महिला रोजगार योजना राबवली जात आहे. महिला रोजगार योजनेंतर्गत महिलांना 10000 रुपये मिळणार आहेत. विशेष म्हणजे येत्या 15 तारखेला महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत.

 

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याच्या दिशेने बिहार सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महिला रोजगार योजनांमुळे महिलांना आपलं आयुष्य नव्यानं घडवता येतं. पात्र महिलांनी अर्ज करून लाभ घेता येणार आहे. महिला रोजगार योजना म्हणजे काय? जाणून घ्या सविस्तर माहिती…

 

देशभरात महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या सशक्तीकरणासाठी केंद्र तसेच विविध राज्य सरकारांकडून अनेक योजना राबवण्यात येत आहेत. महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या दृष्टीने अशा योजनांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. केंद्र शासनाच्या विविध उपक्रमांनंतर महाराष्ट्र सरकारने ‘लाडकी बहीण’ योजना सुरू केली आहे. त्याच धर्तीवर आता बिहार सरकारने ‘महिला रोजगार योजना’ सुरू केली आहे.

 

योजनेचा मुख्य उद्देश काय?

 

राज्यातील महिलांना आर्थिक पाठबळ देऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रेरित करणे, त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि एकूणच महिलांचे सशक्तीकरण करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.बिहार सरकारकडून या योजनेअंतर्गत थेट महिलांच्या बँक खात्यात 10 रुपयांची आर्थिक मदत जमा केली जाणार आहे. ही योजना शहर आणि ग्रामीण भागातील महिलांसाठी आहे. या योजनेमुळे महिलांना नोकरीसाठी बाहेर जावे लागणार नाही. महिला घरबसल्या व्यवसाय करू शकतात. महिलांमध्ये आत्मविश्वास वाढणार आहे.

 

 

महिलांच्या खात्यात कधी जमा होणार पैसे?

 

महिला रोजगार योजनेची नोंदणी प्रक्रिया 7 सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. पात्र महिलांनी योग्य प्रकारे अर्ज केल्यास, त्यांच्याकडे असलेल्या खात्यावर 15 सप्टेंबर 2025 रोजी 10 हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत. ही रक्कम महिला स्वतःच्या उपजीविकेसाठी वापरू शकतात.

 

योजनेसाठी कसा कराल अर्ज ?

 

महिला रोजगार योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी काही बाबी आवश्यक आहेत. त्यात आधार कार्ड, बँक खात्याचा तपशील, आणि ओळख पटवणारे इतर दस्तऐवज आवश्यक आहे. शहरी भागातील महिलांना ऑनलाईन माध्यमातून अर्ज करता येईल तर ग्रामीण भागातील महिला गावातील संकुल स्तरीय संघामध्ये जाऊन ऑफलाईन अर्ज करू शकतात. अर्ज स्वीकारल्यानंतर पात्रतेची तपासणी होऊनच पैसे खात्यात जमा करण्यात येतील.

 

 

या पैशाचा उपयोग कशासाठी करता येईल?

 

महिला रोजगार योजनेंतर्गत मिळणाऱ्या 10 चा उपयोग महिला लघुउद्योग, घरगुती व्यवसाय, किराणा दुकान, शिवणकाम, हस्तकला, शेतीपूरक व्यवसाय सुरू करण्यासाठी करू शकतात. ही रक्कम प्रारंभिक भांडवल म्हणून उपयोगी पडणार आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यास मदत होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -