Tuesday, September 16, 2025
Homeमहाराष्ट्रकॉलेजमध्ये प्रेम, लॉजमध्ये शरीरसंबंधही ठेवले, पण प्रियकराने नंतर केला भयंकर प्रकार; 

कॉलेजमध्ये प्रेम, लॉजमध्ये शरीरसंबंधही ठेवले, पण प्रियकराने नंतर केला भयंकर प्रकार; 

उदगीर येथील एका २४ वर्षीय तरुणीने ‘तू मला आवडतेस, तुझ्यासोबत लग्न करायचे आहे’, असे म्हणून शारीरिक संबंध ठेवले. पीडितेने नकार दिल्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी देत जबरदस्तीने अत्याचार केला.

 

आरोपी किरण विठ्ठल सूर्यवंशी (रा. गुडसूर ता. उदगीर) हा पीडितेस पाच महिन्यांपूर्वी दुपारी दोन वाजेच्या सुमारास शहरातील उमा चौकातील साईकृपा लॉज येथे घेऊन गेला. तेथे ‘तू मला खूप आवडतेस, तुझ्यासोबत लग्न करायचे आहे, तुझ्यासोबत शारीरिक सबंध ठेऊ दे, असे सांगितले.

 

पीडितेने आरोपीस नकार दिला. नकारानंतर आरोपीने तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. ही बाब कोणाला सांगितली, तर जीवे मारण्याची धमकीही आरोपीने तरुणीला दिली. यावरून शनिवारी (दि. १३) आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

एकाच महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या मित्रांचे प्रेम प्रकरण

 

उदगीर येथील एका नामांकित महाविद्यालयामध्ये आरोपी शिक्षण घेत असताना महाविद्यालयात दोघांमध्ये मैत्री झाली. यानंतर एकदा पीडित मुलीला मुलाने विश्वासात घेऊन लॉजवर नेऊन शारीरिक संबंध ठेवले. यानंतर आपण भविष्यात लग्न करू आणि आपला सुखाचा संसार थाटू असे सांगितले. आरोपीने तू माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव, नाहीतर तुझा जीव घेईन, अशा शब्दात धमक्या देण्यास सुरुवात केली. काही दिवसांनी पीडित मुलीने ही गोष्ट आपल्या कुटुंबीयांना सांगितल्यानंतर शनिवारी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

जिल्हाभरातील प्रेमप्रकरणातून अतिप्रसंगाच्या अनेक घटना उघड

 

मागील काही महिन्यांपासून अशा घटना वारंवार समोर येत आहेत. कॉलेजमध्ये एकमेकांसोबत जुळलेली रेशीमगाठ यानंतर त्याचे रूपांतर अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये होताना समोर येत आहे. मागील काही महिन्यांमध्ये समुपदेशन करून पोलिसांनी जवळपास 180 मिसिंग केस असलेल्या मुलींना परत त्यांच्या आई-वडिलांच्या ताब्यात दिले आहे.

 

लातूर ही शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखली जाते, यामध्ये राज्यातील व राज्याबाहेरील विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. लातूर जिल्ह्यात गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. यामुळे पालकांमध्ये चिंतेची वातावरण निर्माण झालं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -