Tuesday, September 16, 2025
Homeमहाराष्ट्रकुंभोज-दानोळी रस्त्यावर बिबट्याचा वावर; नागरिकांत

कुंभोज-दानोळी रस्त्यावर बिबट्याचा वावर; नागरिकांत

हातकणंगले तालुक्यातील कुंभोज-दानोळी रोडवरील कुंभोज हद्दीतील अमित पोवेकर यांच्या जनावरांचा गोठा व महेश पांडव यांच्या पोल्ट्रीजवळ रविवारी (दि.१४) रात्री साडेआठच्या सुमारास बिबट्या आढळून आला.

 

ही घटना सीसीटिव्हीत कैद झाल्याने परिसरातील नागरिकांत घबराहट पसरली आहे. कुंभोज हद्दीतील शेतामध्ये अमित पोवेकर यांच्या जनावरांच्या गोठ्यात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाला. हा बिबट्या बाबुजमाल डोंगराच्या दिशेने गेल्याचे दिसून येत आहे.

 

कुंभोज व दानोळी गावातील नागरिकांनी महेश पांडव व अमित पोवेकर यांच्या मळ्याजवळ मोठी गर्दी केली. नागरिकांनी त्या परिसरात बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र बिबट्या परिसरात आढळून आला नाही. ज्या भागात बिबट्या आढळून आला आहे, त्या ठिकाणी रात्री अपरात्री शेतकऱ्यांनी शेतात पाणी पाजायला जाऊ नये, असे आवाहन ग्रामस्थांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे.

 

हातकणंगले तालुक्यातील कुंभोज, दानोळी, आळते, नेज, शिवपुरी, हिंगणगाव या गावांमध्ये बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून, त्याच्या हल्ल्यामुळे पाळीव जनावरे बळी ठरत आहेत. या प्रकारामुळे पशुपालनावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी दिवस-रात्र पिकांना पाणी देण्यासाठी शेतात राबत आहेत. मात्र, बिबट्याच्या दहशतीमुळे महिला व मजूर शेतात जाण्यास धजावत नाहीत. त्यामुळे शेतीचे काम ठप्प होण्याची वेळ आली आहे. सध्या शेतकरी शिवारात रात्रंदिवस कष्ट करत आहे. मात्र, बिबट्याच्या दहशतीमुळे महिलांचा व मजुरांचा सहभाग घटत आहे. शेतीचे काम खोळंबत असून वन विभागाने तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. मोकाट शेळ्या, श्वान, वासरे आणि इतर जनावरे हल्ल्याच्या टप्प्यात आली आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -