Tuesday, September 16, 2025
Homeमहाराष्ट्रअबब! 2 कोटींवर कॅश अन् सोन्याचं घबाड जप्त, या महिला अधिकाऱ्याच्या घरी...

अबब! 2 कोटींवर कॅश अन् सोन्याचं घबाड जप्त, या महिला अधिकाऱ्याच्या घरी मुख्यमंत्र्‍याच्या पथकाचा छापा

मुख्यमंत्र्‍याच्या दक्षता पथकाने एका नागरी सेवा अधिकाऱ्याच्या घरात छापा टाकल्यानंतर पथकातील कर्मचारी, अधिकारीही थक्क झाले एवढी माया, नागरी सेवा अधिकाऱ्याच्या घरात सापडली.

 

मोजता, मोजता पथकही थकून गेले, तब्बल दोन कोटींवर धन या अधिकाऱ्याच्या घरातून जप्त करण्यात आले आहे.

 

आसाममध्ये आसाम नागरी सेवा (ACS) अधिकारी नुपूर बोरा यांच्या घरावर हा मुख्यमंत्री दक्षता पथकाने हा छापा घातला; या छाप्यामुळे आसाममध्ये भ्रष्टाचारविरोधी मोहिमेला मोठे यश मिळाल्याचे यातून दिसून येत आहे. नुपूर बोरा यांच्या गुवाहाटी येथील घरावर मुख्यमंत्री दक्षता पथकाने छापा टाकला. या छाप्यात तब्बल ९० लाख रुपयांची रोकड आणि १ कोटी रुपयांहून अधिक किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून जप्त केलेल्या मालमत्तेचे मूल्य सुमारे २ कोटी रुपये झाले आहे.

 

काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?

 

मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सांगितले की, नूपुर बोरा गेल्या सहा महिन्यांपासून दक्षता पथकाच्या पाळतीवर होत्या. बारपेटा जिल्ह्यात सर्कल ऑफिसर म्हणून काम करत असताना, त्यांनी कथितरित्या ‘मिया’ (अवैध स्थलांतरित) म्हणून संशयित असलेल्या लोकांसाठी बेकायदेशीर जमीन नोंदणी करून दिली होती, असा त्यांच्यावर आरोप आहे.

 

मुख्यमंत्री दक्षता पथकाच्या एसपी रोजी कलिता यांनी या कारवाईचे नेतृत्व केले. बोरा यांच्याविरुद्ध अनेक भ्रष्टाचाराचे आरोप असल्याची माहिती कलिता यांनी दिल्याचे वनइंडियाच्या वृत्तात म्हटले आहे.

 

..म्हणून आधी छापा घालण्याचा प्लॅन केला रद्द

 

प्राप्त माहितीनुसार, सुरुवातीला रविवारी रात्री छापा टाकण्याचे नियोजन होते, पण नूपुर बोरा घरी नसल्याने तो पुढे ढकलण्यात आला. त्या एका गेस्ट हाऊसमध्ये थांबल्या होत्या. सोमवारी सकाळी त्या गुवाहाटी येथील घरी परतल्यानंतर ही कारवाई सुरू झाली. त्यानंतर त्यांच्याशी संबंधित आणखी तीन ठिकाणी छापे टाकण्यात आले.

 

काम करुन देण्यासाठी बोरा यांचे होत रेट कार्ड

 

स्थानिक सामाजिक कार्यकर्ते कृषक मुक्ती संग्राम समिती (KMSS), ज्याचे नेतृत्व आमदार अखिल गोगोई करतात, त्यांनी बोरा यांच्याविरुद्ध औपचारिक तक्रार दाखल करून या प्रकरणात राज्याला पाठिंबा दिला आहे. तक्रारीनुसार, बोरा यांनी जमीन-संबंधित सेवांसाठी ‘रेट कार्ड’ तयार केले होते, ज्यात जमीन नकाशासाठी १,५०० रुपयांपासून ते जमिनीच्या नोंदीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी किंवा रद्द करण्यासाठी २ लाख रुपयांपर्यंत लाच घेतली जात होती.

 

एसपी रोजी कलिता यांनी सांगितले की, जप्त केलेली रोकड आणि दागिने ही फक्त प्राथमिक कारवाई आहे आणि पुढील तपासात अधिक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -