Monday, November 24, 2025
Homeसांगलीऊस मजूर पुरविण्याच्या आमिषाने शेतकर्‍यास आठ लाखांचा गंडा

ऊस मजूर पुरविण्याच्या आमिषाने शेतकर्‍यास आठ लाखांचा गंडा

ऊसतोड मजूर पुरवण्यासाठी खटाव (ता. पलूस) येथील शेतकर्‍याची आठ लाख 9 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याबाबत भिलवडी पोलिसांत गुजरातमधील दोघा मुकादमांवर गुन्हा दाखल झाला आहे.

 

याप्रकरणी एका मुकादमाला अटक करण्यात आली आहे.

 

खटाव येथील नितीन राजाराम ढेरे यांना राजूभाई गणपतभाई पवार (रा. रावचोड, ता. अहवा, जि. डांग), मोहनभाई हरजसिंग (रा. लिंगा, ता. अहवा, जि. डांग, गुजरात) या दोघांनी 2023 या गळीत हंगामासाठी ऊसतोड मजूर पुरवविण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी ढेरे यांच्याकडून आठ लाख 9 हजार रुपये बँकेतून व रोख स्वरूपात घेतले. 30 मजूर पुरवतो, असे सांगून ढेरे व त्यांचे मित्र श्रीकृष्ण शिवलिंग पाटील यांनी क्रांती कारखान्याच्या ऊसतोडीसाठी त्यांना पैसे पुरवले. मात्र, राजूभाई पवार व मोहनभाई हरजसिंग यांनी मजूर न पुरवता त्यांचे पैसे देण्यास टाळाटाळ केली.

 

याप्रकरणी ढेरे आणि पाटील यांनी भिलवडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी गुजरातमधून मुकादम राजूभाई पवार यांना ताब्यात घेतले. हवालदार अरविंद कोळी व रामचंद्र गायकवाड यांनी ही कारवाई केली. अधिक तपास भिलवडी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक भगवान पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली रोहिदास पावसे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -