नांदणी (ता. शिरोळ) येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य संस्थान मठ, राज्य सरकार व वनतारा यांच्या वतीने उच्चस्तरीय समितीकडे गुरुवारी सायंकाळी सात वाजता ऑनलाईन पद्धतीने सुनावणी झाली.
यात उच्चस्तरीय समितीने सहा ऑक्टोबरपर्यंत नांदणी मठ आणि वनतारांकडून नांदणी येथे उभारण्यात येणार्या हत्ती पुनर्वसन केंद्रात कोणत्या सुविधा होणार आहेत याची माहिती द्या, असा आदेश दिला आहे. दरम्यान, महादेवी परत आणण्यासाठी संयुक्त प्रस्ताव देण्याचे आदेश उच्चस्तरीय समितीने दिले आहेत. या आदेशावर मठाने एक आठवड्याची मुदत मागितली. त्यामुळे महादेवी हत्तीण परत येण्याचा मार्ग सुकर झाला आहे. पुढील सुनावणी 14 ऑक्टोबरला होणार आहे.
पेटाचा मुद्दा खोडून काढला
स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य संस्थान मठ नांदणी, राज्य सरकार , वनतारा व वन विभाग यांच्या वतीने संयुक्त प्रस्ताव दाखल करावा असा आदेश समितीचे अध्यक्ष वर्मा यांनी दिला. हा आदेश देत असताना पेटाने केलेला युक्तीवाद अध्यक्षांनी खोडून काढत महादेवी हत्तीची जागा तांत्रिक हत्ती घेऊ शकत नसल्याचे स्पष्ट केले. यामुळे हत्तीण परत येणाचा मार्ग सुकर झाला असल्याची माहिती मठाच्या वतीने सागर शंभूशेटे यांनी दिली.




