Saturday, November 1, 2025
Homeमहाराष्ट्र1 लाख गुंतवून कमावले असते 2 कोटी! या शेअरने तोडले सर्व रेकॉर्ड,...

1 लाख गुंतवून कमावले असते 2 कोटी! या शेअरने तोडले सर्व रेकॉर्ड, आता किंमत काय?

शेअर बाजारात तगड्या कमाईसाठी अभ्यास, नियोजन अत्यावश्यक आहे. सोबत योग्य शेअर निवडण्याची जादू आली पाहिजे. IFB Agro Industries या शेअरने गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर रिटर्न दिला आहे. कधी काळी हा पेनी स्टॉक होता. पण आज त्याने भल्याभल्या शेअर्सच्या तोंडचे पाणी पळवले आहे. आज या शेअरने कोट्यवधींचा परतावा दिला आहे. ऑक्टोबर 2002 मध्ये IFB Agro Industries शेअर अवघ्या 3.90 रुपयांवर होता. तो आज एनएसईवर जवळपास 816 रुपयांच्या घरात आहे.

 

या शेअरने 21 वर्षांत गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे 2 कोटी इतके मूल्य झाले आहे. एक लाख जर एखादाने गुंतवले असते तर आज त्याची किंमत 2.09 कोटी इतकी झाली असती. शुक्रवारी हा शेअर एनएसईवर उसळला. हा शेअर 828 रुपयांवर ट्रेड करत होता.

 

या शेअरने दीर्घ कालावधीत गुंतवणूकदारांना 7,363% टक्क्यांपेक्षा अधिकचा परतावा दिला आहे. या स्टॉकमध्ये जवळपास 71 टक्क्यांची तेजी दिसून आली. तर एका वर्षात हा शेअर 44 टक्क्यांनी वधारला. वर्ष 2025 च्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत या शेअरमध्ये 40 टक्क्यांहून अधिकची वाढ नोंदवल्या गेली आहे. जानेवारीमध्ये हा स्टॉक 582 रुपयांवर पोहचला. तर आता तो 828 रुपयांवर आहे. म्हणजे या कालावधीतही त्याने गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे.

 

गुंतवणूकदारांना धडा

 

काही गुंतवणूकदार फार धरसोड करतात. त्यांना झटपट श्रीमंत व्हायचे असते. कुणाच्या तरी सांगण्यावरून ते शेअर खरेदी विक्री करतात. पेनी शेअरविषयी तर ते कायम नाक मुरडतात. कधी एकदा नफा घेतो आणि बाहेर पडतो असं त्याचा हावरेपणा त्यांना नडतो. चांगला स्टॉक निवडायचा त्याची तांत्रिक, आर्थिक बाजू तपासायची, औद्योगिक घोडदौड पाहायची ही कामं अनेकांना नको वाटतात. त्यामुळे ते छोट्या छोट्या प्रॉफिटवर खूश असतात. पण जेव्हा असा लंबी रेस का घोडा हातातून निसटतो तेव्हा मग ते दोष देतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -