कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आलीये. नवऱ्याचे तृतीयपंथीसोबत अनैतिक संबंध असल्यामुळे बायकोने त्याला जाब विचारण्यास सुरुवात केली.
सतत वाद सुरु असतानाच नवऱ्याने बायकोची कोयता आणि हातोड्याने वार करुन हत्या केल्याची घटना समोर आली आहे. भादोले-कोरेगाव रस्त्यावर भादोले गावच्या हद्दीत ही घटना घडलीये. रोहिणी प्रशांत पाटील (वय 28) असं हत्या झालेल्या पत्नीचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी रोहिणीचा पती प्रशांत पाटील याला ताब्यात घेतलंय.
हत्या प्रकरणात आणखी काही जण सामील असल्याचा संशय
अधिकची माहिती अशी की, तृतीयपंथीयासोबत असलेल्या अनैतिक संबंधामुळे पती प्रशांत पाटील याने भादोले- कोरेगाव रस्त्यावर पत्नी रोहिणी पाटील हिची कोयत्याने आणि हातोडीने वार करून हत्या केली आहे. दरम्यान, त्यापूर्वी प्रशांतने पत्नीच्या डोळ्यात चटणी देखील टाकली होती. ही घटना घटना सोमवारी (दि. 29) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी वडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. पती प्रशांत हा मध्यरात्री कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत हजर झाला. तर रात्री नातेवाईकाने पती प्रशांत बरोबर या हत्या प्रकरणा आणखी काहीजण सामील असल्याची शक्यता वर्तवली आहे. शिवाय, नातेवाईकांनी या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे. दरम्यान, प्रशांत पाटील याला न्यायालयात हजर केले असता, त्याला तीन ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
तृथीयपंथीयासोबत संबंध असल्याने बायकोची कोयत्याने वार करुन हत्या
कोल्हापूर जिल्हा हातकणंगले तालुक्यातील भादोले इथल्या प्रशांत पाटील हा पत्नी रोहिणी, दोन मुली, आई, वडील याच्यासमवेत राहत होता. प्रशांत याचे एका तृतीयपंथीया सोबत चार, पाच वर्षापासून अनैतिक संबंध होते. याची माहिती मिळाल्यापासून पत्नी रोहिणी आणि पती प्रशांत यांच्यात वाद सुरु होता. रोहिणीचं माहेर सांगली जिल्ह्यातील ढवळी येथे होतं. तिचे वडील आजारी असल्यान दवाखान्यात उपचार सुरु होते. त्यामुळे गेल्या आठवडा भरापासून ते दोघेजण ये-जा करत होते. सोमवारी रात्री ढवळी इथून पती-पत्नी दोघे भादोलेला येण्यासाठी मोटारसायकलने निघाले होते.
दरम्यान, रात्री नऊ वाजता कोरेगाव-भादोले रस्त्यावर आले असता पती प्रशांत याने पत्नी रोहिणी हिच्या डोळ्यात चटणी टाकली. त्यानंतर त्याने पत्नीचा गळ्यावर, डोक्यावर, चेहऱ्यावर कोयता आणि हातोडीने हल्ला करून तिला संपवलं. पत्नीचा खून केल्यानंतर प्रशांतने गावातील लोकांना पत्नीचा खून केल्याचे सांगून मुलींकडे लक्ष ठेवा. मी आता पाच-सहा महिने येणार नाही, असे सांगून फरार झाला. या घटनेने भादोले गावात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे व अन्य पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.




