दसऱ्याच्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे.२४ कॅरेट सोनं प्रति तोळा ५५० रुपयांनी स्वस्त झाले आहे.चांदीच्या दरात मात्र वाढ झाली असून प्रति किलो २००० रुपयांची वाढ झाली.सोनं खरेदीसाठी आज सुवर्णसंधी आहे.साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसऱ्याला सोनं खरेदी करणं शुभ मानले जाते. आज मोठ्याप्रमाणात सोनं खरेदी केलं जातं. दसऱ्याच्या दिवशी ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. सोन्याच्या दरात आज मोठी घट झाली आहे. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये आज तब्बल ५५० रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे आज सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. सोन्याच्या दरात घसरण झाली पण चांदीचे दर मात्र वाढले आहेत. आज दसऱ्यानिमित्त सोनं खरेदी करायला जाण्यापूर्वी १८,२२ आणि २४ कॅरेटचे दर किती आहेत ते जाणून घ्या…
गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या सोन्याच्या दरात मोठी घट झाली आहे. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर ५५० रुपयांनी कमी झाले आहेत. आज २४ कॅरेटचे एक तोळा सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला १,१८,६९० रुपये मोजावे लागणार आहे. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ५५०० रुपयांनी घट झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला ११,८६,९०० रुपये खर्च लागणार आहेत. आज जास्त प्रमाणात सोन्याचे बिस्टिक, नाणं खरेदी केले जाते. त्यामुळे २४ कॅरेटचं हे सोनं खरेदी करण्यासाठी चांगील संधी आहे.
सोन्याचे दागिने हे २२ कॅरेटमध्ये तयार केले जातात. त्यामुळे आज २२ कॅरेटचे दागिने खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे कारण याच्या दरात देखील मोठी घट झाली आहे. आज २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ५०० रुपयांनी घट झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज १,०८,८०० रुपये मोजावे लागणार आहे. तर २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याचे दर ५००० रुपयांनी कमी झाले आहे . हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १०,८८,००० रुपये मोजावे लागणार आहेत.
त्याचसोबत, आज १८ कॅरेट सोन्याचे दर देखील कमी झालेले आहेत. १८ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात ३८० रुपयांनी घट झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला ८९,०२० रुपये खर्च करावे लागणार आहेत. तर १८ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ३८०० रुपयांनी घट झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला ८,९०,२०० रुपये मोजावे लागतील.
एकीकडे आज सोन्याचे दर जरी कमी झाले असले तरी चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आज एक ग्राम चांदीच्या दरात २ रुपयांनी वाढ झाली आहे. ही चांदी खरेदीसाठी तुम्हाला आज १५३ रुपये मोजावे लागणार आहेत. तर १ किलो चांदीच्या दरामध्ये २००० रुपयांनी वाढ झाली आहे. ही चांदी खरेदीसाठी आज तुम्हाला १,५३,००० रुपये खर्च करावे लागणार आहेत.
