गेल्या वर्षी राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत महिलांना प्रतिमहिना १५०० रुपये देण्याचं सरकारने जाहीर केलं होतं. महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली होती.
त्या म्हणाल्या, की ”मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे E-KYC करताना OTP बाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. महिला व बालविकास विभागाच्यावतीने याची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून, तज्ञांच्या माध्यमातून याबाबत उपायोजना करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. लवकरच ही तांत्रिक अडचण दूर होऊन E-KYC प्रक्रिया अधिक सुलभ व सुकर होणार याबाबत मी सर्व लाडक्या बहिणींना आश्वस्त करते.
e-KYC कशी करावी?
१) लाकडी बहीण योजनेच्या संकेतस्थळावर जाऊन लॉगीन करा.
२) पहिल्या पानावर e-KYC चा ऑप्शन दिसेल. त्यावर .
३) आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकून ‘Send OTP’ बटणावर .
४) मोबाईलवर आलेला OTP टाकून ‘Submit’ करा.
५) त्यानंतर तुमचा आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत आहे की नाही हे तपासले जाईल.
६) पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकून OTP मिळवा.
७) जात प्रवर्ग निवडा आणि खालील बाबी प्रमाणित करा:
तुमच्या कुटुंबातील कोणीही शासकीय कर्मचारी किंवा निवृत्तीवेतनधारक नाही.
कुटुंबातील फक्त एक विवाहित आणि एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे.
८) चेक बॉक्सवर क्लिक करून ‘Submit’ बटण दाबा. यशस्वी झाल्यास “e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल.

