Thursday, November 13, 2025
Homeमहाराष्ट्रअरबाज खान बनला पिता : पत्‍नी शूराने दिला गोंडस मुलीला जन्म

अरबाज खान बनला पिता : पत्‍नी शूराने दिला गोंडस मुलीला जन्म

प्रसिद्ध अभिनेता अरबाज खान वयाच्या ५८ व्या वर्षी बाप बनला आहे. त्‍याची पत्‍नी शूरा हिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. शूरा हिला ४ ऑक्टोबर रोजी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

 

रविवारी, ५ ऑक्टोबर रोजी शूरा हिने एका मुलीला जन्म दिला आहे.

 

या बातमीनंतर चाहत्‍यांनी त्यांच्या मुलीच्या जन्माबद्दल अरबाज व शूरा या जोडप्याचे अभिनंदन करत आहेत. अरबाजचा भाऊ आणि अभिनेता सलमान खान देखील हा प्रसंग साजरा करण्यासाठी त्याच्या पनवेल फार्महाऊसवरून परतत आहे. अरबाज आणि शूरा यांनी अलीकडेच बेबी शॉवर पार्टीचे आयोजन केले होते, ज्यामध्ये संपूर्ण खान कुटुंब आणि अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. सलमान खाननेही त्याच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित राहिला होता. यासह सोहेल खान आणि सलमा खान जवळच्या मित्रांसह उपस्थित होते.मुलगीच्या आगमानाने खान कुटंबीयामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

 

दरम्‍यान मलायका अरोरा बरोबर घटस्‍फोट झाल्‍यानंतर अरबाजखान अनेक वर्षे सिंगलच होता. त्‍यांनतर काही वर्षांनी अरबाज खानची शुराची भेट अभिनेत्री रविना टंडन हिची फिल्‍म ‘पटना शुक्‍ला’च्या सेटवर झाली. अरबाज खान या फिल्‍मचे प्रोड्यूसर आहेत. त्‍यावेळी शूरा ही मुख्य मेकअप आर्टीस्‍ट म्‍हणून काम करत होती. यावेळी तिचे व अरबाज हिच्यामध्ये ओळख झाली. नंतर त्‍यांच्यात प्रेम निर्माण झाले. नंतर या दोघांनी २४ डिसेंबर २०२३ ला लग्‍न केले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -