Saturday, October 18, 2025
Homeमहाराष्ट्रकॉमेडियन कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार, लॉरेंस गँगने घेतली जबाबदारी

कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार, लॉरेंस गँगने घेतली जबाबदारी

कॅनडामध्ये कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा एकदा गोळीबार करण्यात आला आहे. यापूर्वीही कपिल शर्माचा कॅफे कॅप्स कॅफेवर दोन वेळा गोळीबार झाला होता. आता पुन्हा झालेल्या गोळीबारानंतर कॅफेवर एकून तीन वेळा गोळीबार झाला आहे. या गोळीबाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तसेच या गोळीबारीचा जबाबदारी पुन्हा एकदा लॉरेंस बिश्नोई गँगशी संबंधित गोल्डी ढिल्लो आणि कुलदीप सिद्धू नेपाळी यांनी घेतली आहे.

 

सोशल मीडियावर शेअर केली पोस्टसोशल मीडियावर पोस्ट लिहून लॉरेंस गँगने कपिल शर्माच्या कॅफेवर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी घेतली आहे. त्यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये, वाहेगुरू जी का खालसा, वाहेगुरू जी की फतेह. आज जो (Kaps Caffe, सरे) मध्ये तिसऱ्यांदा गोळीबार झाला आहे, त्याची जबाबदारी मी, कुलवीर सिद्धू आणि गोल्डी ढिल्लों घेतो. आमचे सामान्य जनतेसोबत कोणतेही वैर नाही. ज्यांच्याशी आमचा भांडण आहे, ते आमच्यासून दूर राहतील त्यांनी असे म्हटले आहे.

 

लॉरेन्स गँगने घेतली जबाबदारी

सोशल मीडिया पोस्टमध्ये पुढे त्यांनी लिहिले की जे लोक बेकायदेशीर (दोन नंबरचे) काम करतात, लोकांना काम करवून पैसे देत नाहीत, तेही तयार राहतील. जे बॉलिवूडमध्ये धर्माविरुद्ध बोलतात, तेही तयार राहतील. गोळी कुठूनही येऊ शकते. वाहेगुरू जी का खालसा, वाहेगुरू जी की फतेह.

 

10 जुलै आणि 7 ऑगस्टला झाला होता पहिला गोळीबार

कपिलच्या याच रेस्टॉरंटवर यापूर्वी दोन वेळा गोळीबार झाला आहे. पहिल्यांदा गोळीबार 10 जुलैला आणि दुसऱ्यांदा 7 ऑगस्टला झाला होता. त्या वेळीही जबाबदारी गोल्डी ढिल्लोंने घेतली होती. गोळीबार केल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट करत, जय श्री राम, सत श्री अकाल, राम राम सर्व बंधूंना. आज जो गोळीबार झाला तो कपिल शर्माच्या सरे येथील कॅप्स कॅफेवर झाला, त्याची जबाबदारी गोल्डी ढिल्लों आणि लॉरेंस बिश्नोई गँग घेते. आम्ही याला फोन केला होता, पण त्याने फोन उचलला नाही. म्हणून कारवाई करावी लागली. आता जर उत्तर मिळाले नाही तर कारवाई मुंबईत होईल असे म्हटले होते. ही पोस्ट त्या वेळी खूप व्हायरल झाली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -