पोलिसांनी दोघांविरुद्ध संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.तृतीयपंथीय समाजात ‘पायल गुरु’ आणि ‘सीमा गुरु’ गटांमध्ये सिंहासन व मालमत्तेवरून वाद सुरू आहे.
सर्व पीडितांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मध्य प्रदेशातील इंदूर येथील नंदलालपुरा येथे एका तृतीयपंथीयाने दोन कथित मीडिया कर्मचाऱ्यांवर लैंगिक अत्याचार, मारहाण आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर काही तासांतच सुमारे २४ ट्रान्सजेंडर महिलांनी विष प्राशन केले, ज्यामुळे संपूर्ण शहरात खळबळ सर्व पीडितांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तृतीयपंथीयाने सांगितले की २४ मे रोजी तिच्या गुरूविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. त्यानंतर, १२ जून रोजी तथाकथित पत्रकार आरोपी पंकज जैन आणि त्याचा साथीदार अक्षय तिच्या छावणीत आले.तिने आरोप केला की त्या दोघांनी तिला धमकावले, नंतर तिला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. जर तिने प्रतिकार केला तर त्यांनी तिला एन्काउंटर आणि सामाजिक बदनामीची धमकी दिली.ही घटना तिच्या गुरूंना सांगितली, पोलिस ठाण्यात जाऊन एफआयआर दाखल केला.
पीडितेने सांगितले की घटनेनंतर तिने तिच्या गुरूंना सर्व काही सांगितले आणि मंगळवारी पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध बलात्कार, मारहाण आणि धमकीच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे आणि तपास सुरू केला आहे.
वर्चस्वावरुन दोन गटांमध्ये जुना वाद
वृत्तानुसार, पायल गुरु आणि सीमा गुरु या दोन गटांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सिंहासन आणि मालमत्तेवरून ट्रान्सजेंडर समुदायात तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही बाजूंमध्ये अनेक वेळा भांडणे झाली आहेत. माजी पोलिस उपायुक्त (डीसी) संतोष सिंह यांनी या वादाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले होते, परंतु जवळजवळ तीन महिने उलटूनही तपासात प्रगती झालेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डीसीपी ऋषिकेश मीना यांच्या बदलीनंतर ही चौकशी थांबवली गेली.
तृतीयपंथीयांनी केले विष प्राशन
बुधवारी संध्याकाळी, नंदलालपुरा परिसरात अंदाजे २४ तृतीयपंथीय महिलांनी फिनाईल सारखे विषारी पदार्थ प्राशन केले. घटनास्थळी गोंधळ उडाला. पोलिस आणि रुग्णवाहिका पथकांनी तातडीने तिथे पोहोचले, सर्वांना हॉस्पिटलमध्ये नेले. अतिरिक्त डीसीपी राजेश दंडोटिया यांनी सांगितले की सर्व बाधित व्यक्तींवर उपचार सुरू आहेत, पण विष का प्राशन केले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही असे पोलिसांचे म्हणणे आहे.