आपल्या अभिनयाच्या जोरावर कित्येक वर्षे रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे दिग्गज अभिनेते गोवर्धन असरानी यांचे निधन झाले आहे. हिंदी सिनेसृष्टीत एक कसलेला आणि बहुआयामी अभिनेता म्हणून त्याचा नावलौकिक होता. आतापर्यंत त्यांनी अनेक चित्रपटांत विनोदी तसेच इतर भूमिका साकारल्या. त्यांनी साकारलेल्या काही भूमिका तर आजदेखील अजरामर आणि कायम स्मरणात राहणाऱ्या आहेत. त्यांच्या जाण्याने सिनेजगतातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
दीर्घकाळापासून चालू होते उपचार
मिळालेल्या माहितीनुसार गोवर्धन असरानी यांचे आज (20 नोव्हेंबर) सायकाळी चार वाजता निधन झाले. दीर्घकाळापासून ते एका आजारावर उपचार घेत होते. शरीराने उपचाराला साथ न दिल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. ते मूळचे राजस्थान राज्यातील जयपूर येथील रहिवासी होते. त्यांनी आपले जयपूरमधील शिक्षण सेंट झेवियर्स येथून घेतले होते. असरानी यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक मोठ्या चित्रपटांत काम केले. परंतु त्यांनी साकारलेल्या काही विनोदी भूमिका मात्र लोकांच्या आजही स्मरणात आहेत. शोले चित्रपटात त्यांनी साकारेलल्या जेलरची भूमिका तर आजही तेवढीच ताजी आणि खळखळून हसवणारी आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.






