ताजी बातमी ऑनलाईन टीम
राज्यात कोरोनाव्हायरसचा (Corona Virus) पुन्हा उद्रेक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. त्यात ओमिक्रॉनच्या (Omicron Variant) रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. अशातच राज्यात चिंता वाढणार माहिती समोर आली आहे. ती म्हणजे राज्यातील निवासी डॉक्टरांनी देखील संपाचे हत्यार उपसले आहे. राज्यातील निवासी डॉक्टरांनी आजपासून (31 डिसेंबर) शासकीय रुग्णालये आणि महाविद्यालयामधील ओपीडी, नॉन इमर्जन्सी वॉर्ड आणि निवडक सेवा न देण्याचा इशारा दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असताना निवासी डॉक्टरांनी बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. महाराष्ट्र स्टेट असोसिएशन ऑफ रेसिडेंट संघटनेचे सदस्य आज सकाळी 11 वाजेपासून संपाचे हत्यार उपसणार आहे. शासकीय रुग्णालये, महाविद्यालयामधील ओपीडी, नॉन इमर्जन्सी वॉर्ड आणि निवडक सेवा न देण्याचा डॉक्टरांनी इशारा दिला आहे. नीट-पीजी काऊन्सिलिंग प्रक्रियेसंदर्भातली तारीख जाहीर होत नाही, तोपर्यंत संप सुरुच ठेवणार, असल्याचे डॉक्टरांच्या संघटनेने सांगितले आहे. याबाबत लवकर निर्णय न झाल्यास महाराष्ट्रातील इमर्जन्सी सेवा आणि अतिदक्षता सेवेतील निवासी डॉक्टर्स देखील या संपात सहभागी होणार असल्याची माहिती मार्डचे सदस्य डॉ. अक्षय यादव यांनी दिली आहे.
डॉक्टरांनी पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क माफ करावे.
> कोविड इन्सेन्टिव्ह त्वरीत मिळावा.
> शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये उत्तम वसतिगृह सुविधा द्यावी.
> बीएमसीच्या हॉस्पिटल्सच्या निवासी डॉक्टरांच्या स्टायपेंडमधून टीडीएस कापला जाऊ नये.
महाराष्ट्रावर आणखी एक संकट! डॉक्टरांनी उपसले संपाचे हत्यार
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -