Thursday, December 18, 2025
Homeब्रेकिंगसोन्याच भाव धडाम! एका झटक्यात 2000 रुपयांनी स्वस्त, आता 10 ग्रॅमसाठी किती...

सोन्याच भाव धडाम! एका झटक्यात 2000 रुपयांनी स्वस्त, आता 10 ग्रॅमसाठी किती रुपये लागणार?

आपल्या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचल्यानंतर सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंची किंमत आता घसरली आहे. सोने, चांदीची विक्री करून लोक नफा नावावर करत आहेत. त्यामुळेच सध्या सोने, चांदीचा भाव घसरल्याचे समोर आले आहे. दोन्ही धातूंचा भाव कमी झाल्याने आता सामान्यांना दिलासा मिळाला आहे.

 

एमसीएक्सवर सोन्याचा भाव 511 रुपयांनी घसरला आहे. या घसरणीसह आता 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1,33,669 रुपयांपर्यंत खाली आला आहे. तर चांदीचा भाव 1277 रुपयांनी कमी होऊन 1,96,800 रुपये प्रती किलोपर्यंत कमी झाला आहे.

 

जागतिक पातळीवर सोने आणि चांदीच्या मागणीत वाढ झालेली आहे. अशा स्थितीत या दोन्ही धातूंचा भाव कमी झाला आहे. 5 फेब्रुवारीच्या वायद्याच्या 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1,35,496 रुपये या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचला होता. या सार्वकालिक उच्चांकाच्या तुलनेत आता सोन्याचा भाव आजडीला 2000 रुपयांनी कमी झाला आहे.

 

चांदीचा भाव 2,01,615 या सार्वकालिक उच्चांकाच्या तुलनेत 5 हजार रुपयांनी कमी झाला आहे. दरम्यान, सध्या उद्योगांसाठी चांदीची तर गुंतवणुकीसाठी सोन्याची मागणी वाढलेली आहे. त्यामुळे सध्याजरी सोन्याचा भाव पडलेला असला तरी भविष्यात या मौल्यवान धातूंची किंमत काय असेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -